मुंबई – स्वत:ला कट्टर शिवसैनिक म्हणणारे २४ तासांत गुवाहाटीला पळून गेले. ह्यांचे शरीर वाघाचे आहे, तर मन उदरांचे आहे. त्यामुळेच ते ईडीच्या कारवायांना घाबरून सगळे पळाले, असा घणाघात शिवसेना नेते संजय राऊत यांनी शनिवारी बंडखोर आमदारांवर निशाणा साधताना केला.
संजय राऊत पुढे म्हणाले की, गेली दीड वर्षे मी ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहे आणि हे केवळ एका कागदाला घाबरून पक्षाच्या विरोधात जात आहे. ५० कोटी रुपये देत आमदार विकत घेतले गेले. बंडखोरांनी हिंदुत्वाबाबत शिवसेनेला सांगू नये, असे म्हणत आनंद दिघे हे बाळासाहेबांचे हनुमान होते. मात्र, यांचे नाव घेऊन आता त्यांनी राजकारण करू नये, असा टोला राऊतांनी बंडखोर आमदारांना लगावला.
अब्दुल सत्तार यांचे कोणते हिंदुत्व दुरावले, असा प्रश्नही राऊतांनी उपस्थित केला आहे. एकनाथ शिंदे माझे जवळचे मित्र आहेत. त्यांची जुनी भाषणं ऐका. मात्र, कुत्रा सोडला तर कोणीही बेईमानी करू शकतो, असा टोला त्यांनी लगावला आहे. भाजपसोबत असतानाही शिंदेंच्या तक्रारी होत्या. मात्र मुख्यमंत्रिपद देतो म्हणालो, तर एकनाथ शिंदे उड्या मारत मारत येतील, असा दावा राऊत यांनी केला.
शिवसैनिक सोडून गेल्याचे दु:ख आहेच. ठाकरेंच्या मनात शिंदेंचे मुख्यमंत्री होते. 24 तासांत सर्वांचे मंत्रिपद जातील. बंडखोरावर कारवाई होणारच आहे, शिंदेंनी आनंद दिंघेंचे नाव घेऊन राजकारण करू नये असेही संजय राऊत म्हणाले.