मान्सूनपूर्व पावसानेच साखरी-चिटेघर प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला
२००० साली सुरू झालेला साखरी चिटेघर प्रकल्प २०१० साली पूर्णत्वाकडे गेला. आजतागायत १५ वर्षापासून परिसरातील सिंचन व पिण्याच्या पाण्याची सोय झाली. मात्र प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यात शासन व लोकप्रतिनिधींना अपयशच आले आहे. अधिकारी केवळ कागदी घोडे नाचवण्यात दंग आहेत तर लोकप्रतिनिधी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केवळ आश्वासनांचे पाणी पाजत आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
Monsoon Update : आनंदवार्ता! 12 दिवस आधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल
दोन वर्षापूर्वी या विभागात झालेल्या ढगफुटीमुळे धरणात प्रचंड प्रमाणात गाळ साठला आहे. त्याचा परिणाम पाणी साठवण क्षमतेवर होत आहे. या वर्षी धरण काठावरील अनेक विद्युत पंप गाळात अडकून पडले होते. धरणाची साठवण क्षमता गाळामुळे कमी झाली असून गाळ काढल्यास पाणी साठवण क्षमता निश्चितच वाढणार आहे. त्यामुळे प्रशासनाने धरणातील गाळ काढण्याची गरज निर्माण झाली आहे.
मागील चार दिवसांपासून माण तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून, तालुक्याची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या माणगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे. सद्यस्थितीत माणगंगा नदी दुथडी भरून वाहू लागली असून, नदीपात्रात आणखी पाण्याची भर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे म्हसवड नगरपालिकेने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून, कोणीही नदीपात्रात उतरू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.