मुंबई : जर तुम्ही कोकणात गणपतीसाठी जाणार असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे. गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav 2022) कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना पथकर टोल (Toll) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी घेतला असून, त्याची अंमलबजावणी २७ ऑगस्टपासून करण्यात येत आहे. त्यासंदर्भातील आदेश आज जारी करण्यात आला आहे. मुंबई– बंगळूरु राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील आणि (Toll Free For Ganeshotsav 2022) इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही सवलत ११ सप्टेंबरपर्यंत असणार आहे.
[read_also content=”पुन्हा मोदी आले! लोकप्रिय नेत्यांच्या यादीत मोदी अव्वल स्थानी कायम, जो बायडन राहिले ‘ह्या’ नंबरवर https://www.navarashtra.com/india/world-most-popular-leaders-in-pm-narendra-modi-in-top-319698.html”]
कसा मिळवाल टोलमाफीचा पास
परिवहन विभाग, वाहतूक पोलीस संबंधित प्रादेशिक परिवहन विभाग (आर.टी.ओ.) यांनी समन्वय साधून पोलीस स्टेशन, वाहतूक पोलीस चौक्या व आर.टी.ओ. ऑफिसेसमध्ये हे पास दिले जाणार आहेत. परतीच्या प्रवासाकरीता हेच पास ग्राह्य धरण्यात येणार असल्याने ते गणेशभक्तांनी जपून ठेवावे, “गणेशोत्सव २०२२, कोकण दर्शन” असे पास वाहनांवर लावण्यात यावेत. त्यावर गाडीचा क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर नमूद करणे आवश्यक असणार आहे. याचा नमुना देखील राज्यातील पोलीस ठाणे, आरटीओ, वाहतूक विभागांना देण्यात आला आहे.
कुठे–कुठे मिळणार पास
टोलमाफीसाठी मोफत पास (Toll free pass) शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून, त्याचा संकेताक २०२२०८२६१३५८४०८४१८ असा आहे. तसेच ग्रामीण व शहरी पोलीस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्याकडे हे पास मिळणार आहेत. त्यामुळं जर तुम्ही कोकणात गणपतीसाठी जाणार असाल तर तुम्हाला या ठिकाणी पास मिळू शकतील.