Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today: अरेरे! काय आली वेळ, iPhone 17 साठी मारामारी

Marathi Breaking Live Marathi : राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन, अर्थविश्वसह देश-विदेशातील ताज्या घडामोडींसाठी 'नवराष्ट्र'ला भेट देत राहा...

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 19, 2025 | 07:04 PM
Top Marathi News Today : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर

Top Marathi News Today : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर

Follow Us
Close
Follow Us:

Marathi Breaking News Updates : राज्यातील अनेक महानगरपालिका, नगरपालिकांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबणीवर गेल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या रखडलेल्या निवडणुका घेण्यासाठी 31 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.

निवडणुकां संबंधित मागणी करणारा अर्ज सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला असता निवडणूक आयोगाने केलेल्या मागणीवर न्यायालयात मंगळवारी (दि.17) सुनावणी पार पडली. यात सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीसाठी 31 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ दिली. 31 जानेवारीनंतर पुन्हा मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले. या निर्णयामुळे निवडणुकीसाठी तयारी बसलेल्या इच्छुकांच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले.

The liveblog has ended.
  • 19 Sep 2025 06:59 PM (IST)

    19 Sep 2025 06:59 PM (IST)

    भारत-नेपाळमध्ये अनेक वर्षांपासून ऐतिहासिक संबंध; पहिल्या महिला पंतप्रधानांसमोर अनेक आव्हान

    सध्या नेपाळमध्ये पुन्हा एकदा शांतता निर्माण होत आहे. पण ही शांतता किती काळ टिकेल हे कोणालाही माहिती नाही. कारण अंतरिम पंतप्रधान झाल्यानंतर सुशीला कार्की यांनी म्हटले आहे की, भारत आणि नेपाळमधील लिपुलेख, लिंपियाधुरा आणि कालापानी सारखे वाद संविधानाच्या भावनेनुसार सोडवण्याचा प्रयत्न करतील. नेपाळमधील काही लोक त्यांना भारताचे एजंट म्हणून बदनाम करण्याचा प्रयत्न करतील का हे पाहणे बाकी आहे. भारतातील बीएचयूमधून राज्यशास्त्रात एम.ए. पदवी मिळवल्यानंतर शिक्षण आणि कायद्याच्या क्षेत्रात करिअर करणाऱ्या नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधानांसमोरील सर्वात मोठे आव्हान म्हणजे त्या आंदोलन करणाऱ्या तरुणांची स्वप्ने कशी पूर्ण करतात.

  • 19 Sep 2025 06:41 PM (IST)

    19 Sep 2025 06:41 PM (IST)

    Sunil Gavaskar: सुनिल गावस्करचा ‘सूर्य’ला खास सल्ला; ‘संजू-तिलकचा बॅटिंग ऑर्डर बदला, अन् बुमराहला…’

    IND vs OMA: आशिया कप २०२५ मध्ये भारतीय संघाने दमदार कामगिरी करत सुपर-४ मध्ये आपले स्थान पक्के केले आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ विजयरथावर स्वार झाला असून, त्यांनी आतापर्यंत यूएई आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना धूळ चारली आहे. आता त्यांचा पुढील सामना ओमानसोबत अबु धाबीमध्ये होणार आहे. दरम्यान, या सामन्यापूर्वीच भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी कर्णधार सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) प्लेइंग इलेव्हनबाबत महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

  • 19 Sep 2025 06:25 PM (IST)

    19 Sep 2025 06:25 PM (IST)

    दिल्ली विद्यापीठात विदयार्थी संघांच्या निवडणुका! निकाल जाहीर, ABVP आघाडीवर

    दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या (DUSU) निवडणुकीत यंदा RSSशी संलग्न असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) ने मोठा विजय मिळवला आहे. शुक्रवार, 19 सप्टेंबर रोजी घोषित झालेल्या निकालानुसार एबीव्हीपीने अध्यक्ष, सचिव आणि संयुक्त सचिव हे तीन पदे जिंकली, तर एनएसयूआय (NSUI) ला केवळ उपाध्यक्ष पदावर समाधान मानावे लागले. मागील निवडणुकीत NSUI कडे दोन पदे होती, परंतु यंदा त्यांचा अध्यक्षपद गमावल्याने नुकसान झाले आहे.

  • 19 Sep 2025 06:09 PM (IST)

    19 Sep 2025 06:09 PM (IST)

    Election Comission: मोठी बातमी! महाराष्ट्रातील तब्बल 44 पक्षांवर बंदी; निवडणूक आयोगाची कारवाई

    Election Comission Big Breaking: केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने देशभरातील 474 पक्षांची नोंदणी रद्द केली आहे. देशातील बिगर मान्यताप्राप्त पक्षांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. निवडणूक व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

  • 19 Sep 2025 05:46 PM (IST)

    19 Sep 2025 05:46 PM (IST)

    वाहतूक कोंडीने घेतला 2 वर्षीय चिमुकल्याचा जीव!

    वसई परिसरात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. फक्त १ वर्ष ८ महिन्यांच्या चिमुकल्याचा जीव वाहतुकीच्या कोंडीत अडकून गेला. हा मृत्यू अपघातामुळे नव्हे, तर महामार्गावरील निष्काळजीपणा, अव्यवस्था आणि जबाबदारीच्या अभावामुळे झाल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

  • 19 Sep 2025 05:36 PM (IST)

    19 Sep 2025 05:36 PM (IST)

    शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

    शिवसेना शिंदे गटाच्या भिवंडी लोकसभा विभागाची युवा सेनेची कार्यकारीणी जाहीर झाली आहे. ही कार्यकारिणी जाहिर झाल्यावर युवा सेनेच्या एका पदाधिकाऱ्याने राजीनामा दिला आहे. मंगेश गोडे असं या पदाधिकाऱ्याचे नाव असून त्यांनी सोशल मिडीयावर पोस्ट टाकून त्यांनी नाराजी व्यक्त करीत राजीनामा दिल्याचे म्हटले आहे. तर काहींची नाराजी असली तरी त्यांनी उघडपणे जाहिर केलेली नाही. इतकेच नव्हेत शिवसेना आमदार आणि शहर प्रमुखांच्या नातेवाईकांचे पद न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

  • 19 Sep 2025 05:35 PM (IST)

    19 Sep 2025 05:35 PM (IST)

    BJP National President: अध्यक्षपदावरून RSS-भाजपमध्ये बिनसलं? गडकरींच्या उत्तराने उंचावल्या भुवया

    BJP National Presidnet Election: मागील काही महिन्यांपासून भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जागा रिकामी आहे. भाजपच्या इतक्या वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी परिस्थिती उद्भवली आहे की अनेक महीने भाजपच्या अध्यक्षपदाची प्रक्रिया रखडली आहे. दरम्यान आता हा प्रश्न नक्की कधी सुटणार अशी चर्चा सुरू झाली आहे. याबाबत केंद्रीय नितीन गडकरींना प्रश्न विचारले असता त्यांनी काय उत्तर दिले ते जाणून घेऊयात.

  • 19 Sep 2025 05:27 PM (IST)

    19 Sep 2025 05:27 PM (IST)

    कोटींची Ferrari कार E20 पेट्रोलमुळे झाली खराब, चक्क सोशल मीडियावर Nitin Gadkari यांना सुनावलं

    गेल्या काही आठवड्यात, अनेक वाहन मालकांनी इंधनात मिसळलेल्या 20 टक्के इथेनॉलच्या वापराशी संबंधित विविध समस्या नोंदवल्या होत्या. या E20 पेट्रोलमुळे वाहनांच्या मायलेजमध्ये विविध समस्या येत आहे अशी तारकार देखील करण्यात आली होती. अलीकडेच, सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये, कोट्यवधी रुपयांची फेरारी सुरू न झाल्याने रस्त्याच्या कडेला उभी असल्याचे दिसून येते. या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की या कारमध्ये E20 फ्युएल भरले होते. ज्यामुळे आता ती सुरू होत नाही आहे. तसेच या पोस्टमध्ये नितीन गडकरी यांना टॅग केले आहे.

  • 19 Sep 2025 05:04 PM (IST)

    19 Sep 2025 05:04 PM (IST)

    नवी मुंबई पोलीसांची मोठी कारवाई; 72 लाखांचे अंमली पदार्थ जप्त

    हरात बेकायदा ड्रग्जचा व्यापार करणाऱ्या टोळीला पोलीसांनी ताब्यात घेतलं आहेत.सर्वासामान्य वस्तीत अंमली पदार्थांचं रॅकेट उघड झाल्याते परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घणसोली स्टेशन परिसरात एक इसम, अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीलायक माहिती कोपरखैरणे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ दोन पथके तयार करून दोन इसमांना ताब्यात घेतले आहे. दोघांकडून पोलिसांनी 72 लाख रुपये किमतीचे एमडी नामक ड्रग्स हस्तगत केले आहे.

  • 19 Sep 2025 05:01 PM (IST)

    19 Sep 2025 05:01 PM (IST)

    Indrayani : वारकऱ्यांच्या पवित्र इंद्रायणीला मिळणार नवे रुप; नदी सुधार प्रकल्पाला मिळाली मंजूरी

    Indrayani River News : पिंपरी- चिंचवड :  पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागातील सुमारे 50 लाख नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत असलेल्या आणि महाराष्ट्राच्या वारकरी सांप्रदायामध्ये श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला आता चालना मिळाली आहे. राज्य सरकारच्या नगर विकास विभागाच्या राज्यस्तरीय तांत्रिक समितीच्या (SLTC) मान्यतेचा प्रस्तावाला अखेर मान्यता मिळाली. त्यामुळे नदी सुधार प्रकल्पाचे काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला.

  • 19 Sep 2025 04:45 PM (IST)

    19 Sep 2025 04:45 PM (IST)

    स्त्याच्या दुरावस्ते बाबत प्रशासनाचा निषेध म्हणून भीक मागो आंदोलन

    कर्जत तालुक्यातील व कर्जत शहरात रस्त्यांची खड्डे पडून दयनीय अवस्था झाल्याने व रस्त्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने प्रशासनाचा निषेध करत मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांचे नेतृत्वात भीक मागो आंदोलन करण्यात आले.

  • 19 Sep 2025 04:40 PM (IST)

    19 Sep 2025 04:40 PM (IST)

    कुलरचं पाणी पिऊन ऑर्डनन्स फॅक्टरीतील कर्मचाऱ्यांना त्रास

    कुलरचं दूषित पाणी पिऊन १७ ते १८ कर्मचाऱ्यांना त्रास झाल्याची घटना अंबरनाथच्या ऑर्डनन्स मधील एमटीपीएफ कारखान्यात घडली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांवर सध्या ऑर्डनन्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. एमटीपीएफ कारखान्यातील कर्मचारी आज सकाळी नाश्ता केल्यानंतर कारखान्यातील कुलरचं पाणी प्यायले. यानंतर काही वेळातच काही कर्मचाऱ्यांना उलट्या, मळमळ, चक्कर असे त्रास सुरू झाले. या कर्मचाऱ्यांनी कारखान्यातील दवाखान्यात तपासणीसाठी धाव घेतली असता त्यांना ऑर्डनन्स हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. या घटनेनंतर कुलर उघडून पाहणी केली असता फिल्टरमध्ये मोठ्या प्रमाणात माती साचलेली होती. तसंच कुलरची नियमित स्वच्छता झाली नव्हती, त्यामुळेच आपल्याला हा त्रास झाल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला. अधिकाऱ्यांनी या कुलरची पाहणी केली असून वेळेच्या वेळी मेंटेनन्स होत नसल्यामुळे ही घटना घडल्याची कर्मचाऱ्यांची तक्रार आहे.

  • 19 Sep 2025 04:36 PM (IST)

    19 Sep 2025 04:36 PM (IST)

    सायन-पनवेल महामार्गांवर कळंबोली सर्कल या रहदारीच्या ठिकाणी यंत्रणा बसवण्याचे काम

    औद्योगीकरणामुळे हवेत होणाऱ्या प्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत आहे.याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊन आरोग्य विषई विविध समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. याचा विचार करून हवेतील प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने पालिकेच्या माध्यमातून 10 ठिकाणी ही यंत्रणा बसवण्यात येणार आहे.या पूर्वी देशातील तसेच राज्यातील प्रमुख शहरांमध्ये देखील या यंत्रनेचा उपयोग केला जात असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली असून, हवेची गुणवंत्ता वाढवण्यासाठी या यंत्रणेची मोठी मदत होणार असल्याचे मत अधिकऱ्यांनी व्यक्त केले आहे.दिवसेंदिवस हवेची गुणवत्ता ढासळत असल्याने हवा शुद्ध करण्यासाठी पालिकेच्या वतीने विविध भागात हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा (एअर बिन प्युरिफायर) बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवी पालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या निर्णयानुसार सायन-पनवेल महामार्गावर अत्यंत वर्दळीचे ठिकाण असलेल्या कळंबोली सर्कल येथे ही यंत्रणा बसवण्याचे काम सुरु असून, काम पूर्ण होताच ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे.

  • 19 Sep 2025 04:32 PM (IST)

    19 Sep 2025 04:32 PM (IST)

    E-KYC आता लाडक्या बहिणींना ई केव्हायसी करावी लागणार

    राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आता वेब पोर्टल असणार आहे. योजनेत पारदर्शकता यावी म्हणून वेब पोर्टलच्या मदतीने शासन ई केवायसी करणार आहे. महिन्याचं मानधन वेळेत मिळावं यासाठी लाडक्या बहिणींनी ई केवायसी करावे असे आवाहन राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केलं आहे.

  • 19 Sep 2025 04:06 PM (IST)

    19 Sep 2025 04:06 PM (IST)

    CJI Gavai यांनी हिंदूंच्या भावना दुखावल्या? भगवान विष्णूंवरील ‘त्या’ वक्तव्यावरून ट्रोल, अखेर उचलले असे पाऊल..

    CJI Of India: भूषण गवई हे भारताचे सरन्यायाधीश आहेत. मात्र सध्या एका विधानामुळे भूषण गवई  हे चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांनी मध्यप्रदेश मधील खजूराहो येथील एका मंदिरातील भगवान विष्णू यांच्याबाबत केलेले विधान चांगलेच चर्चेत आले आहे. या विधानाने वाद पेटला आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांनीय सोशल मिडियावर ट्रोल केले जात आहे.

  • 19 Sep 2025 03:50 PM (IST)

    19 Sep 2025 03:50 PM (IST)

    इतिहास घडवणार टीम इंडिया!

    आशिया कपचा रोमांच रंगतदार होत चालला आहे. या स्पर्धेत भारतीय संघाने दमदार कामगिरी करत सुपर फोरमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. आज टीम इंडियाचा सामना ओमानविरुद्ध होणार असून, हा सामना केवळ सुपर फोरच्या तयारीपुरता मर्यादित नाही, तर तो भारतीय क्रिकेटसाठी एक ऐतिहासिक क्षण आहे.

  • 19 Sep 2025 03:39 PM (IST)

    19 Sep 2025 03:39 PM (IST)

    ‘भ्रष्टाचाराचा पूर आणि जनतेचे दु:ख…’; नेपाळनंतर आता ‘या’ देशात होणार लोकशक्तीचा महास्फोट

    नेपाळनंतर आणि इंडोनेशियाच्या पावलावर पाऊल ठेवत आता फिलिपिन्सच्या जनतेचा राग उफाळून आला आहे. राजधानी मनिला रविवार, २१ सप्टेंबर रोजी लाखो लोकांच्या पायऱ्यांनी हादरून जाईल. या लोकआंदोलनाला “ट्रिलियन पेसो मार्च” असे नाव देण्यात आले आहे.

  • 19 Sep 2025 03:33 PM (IST)

    19 Sep 2025 03:33 PM (IST)

    GST कपातीनंतर नियम शिथिल, जाहिरातीशिवायही लागू होतील नवीन दर

    सरकारने प्री-पॅकेज केलेल्या वस्तूंच्या उत्पादकांना आणि आयातदारांना महत्त्वपूर्ण दिलासा दिला आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने १८ सप्टेंबर रोजी एक अधिसूचना जारी केली, जीएसटी कपातीनंतर लोकांना नवीन किमतींबद्दल माहिती देण्यासाठी नियम सोपे केले. नवीन जीएसटी दर २२ सप्टेंबरपासून लागू होतील.

  • 19 Sep 2025 03:16 PM (IST)

    19 Sep 2025 03:16 PM (IST)

    “पाकिस्तानमध्ये मला घरासारखे…”; राहुल गांधींच्या निकटवर्तीय नेत्याचे वादग्रस्त विधान

    इंडियन ओव्हरसीज कॉँग्रेसचे अध्यक्ष आणि राहुल गांधी यांचे जवळचे सहकारी सॅम पित्रोदा यांनी केलेल्या एका विधानामुळे नवा वाद उभा राहिला आहे. पाकिस्तान, बांगलादेशमध्ये मला घरात असल्यासारखे वाटते असे विधान त्यांनी केले आहे.

  • 19 Sep 2025 03:11 PM (IST)

    19 Sep 2025 03:11 PM (IST)

    हे भारतीय आहेत की नाही? “पाकिस्तानमध्ये मला घरासारखे…”; राहुल गांधींच्या निकटवर्तीय नेत्याचे वादग्रस्त विधान

    Sam Pitroda Controversial Statement: इंडियन ओव्हरसीज कॉँग्रेसचे अध्यक्ष आणि राहुल गांधी यांचे जवळचे सहकारी सॅम पित्रोदा यांनी केलेल्या एका विधानामुळे नवा वाद उभा राहिला आहे. पाकिस्तान, बांगलादेशमध्ये मला घरात असल्यासारखे वाटते असे विधान त्यांनी केले आहे. त्यांच्या या विधानाचा भाजपने समाचार घेतला आहे. देशाच्या राजकारणात आता आणखी एक नवा वाद निर्माण झाला आहे. हे प्रकरण नक्कीकाय आहे, ते जाणून घेऊयात.

  • 19 Sep 2025 03:06 PM (IST)

    19 Sep 2025 03:06 PM (IST)

    रूममेटशी भांडण अन् पोलीसांनी धाडधाड 4 गोळ्या झाडल्या

    अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये पोलिसांनी एका भारतीय अभियंत्यावर गोळी झाडल्याची घटना समोर आली. मोहम्मद निजामुद्दीन नावाच्या या व्यक्तीचा त्याच्या रूममेटशी वाद झाला होता. तेलंगणातील निजामुद्दीनच्या कुटुंबाने त्याचा मृतदेह परत मिळवण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाकडे मदत मागितली आहे.

  • 19 Sep 2025 02:58 PM (IST)

    19 Sep 2025 02:58 PM (IST)

    भारतीय महिला संघासमोर ‘करो या मरो’ की स्थिती! कोणाच्या हाती लागणार मालिकेचे जेतेपद

    दुसऱ्या सामन्यात विक्रमी विजय मिळवून उत्साहित झालेला भारतीय महिला संघ शनिवारी मुल्लानपूर येथे तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धची पहिली एकदिवसीय मालिका जिंकून विश्वचषकापूर्वी आपल्या आशा उंचावण्याचा प्रयत्न करेल. त

  • 19 Sep 2025 02:55 PM (IST)

    19 Sep 2025 02:55 PM (IST)

    आयसीसीने विश्वचषकासाठी लाँच केले नवे गाणे

    आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 ला सुरु व्हायला काही दिवस शिल्लक राहिले आहेत. भारताचा महिला संघ सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्याची मालिका खेळत आहे. या मालिकेमध्ये 1-1 अशी बरोबरी आहे. भारतीय महिला संघाचे लक्ष्य हे विश्वचषकाच्या ट्राॅफीवर असणार आहे.  भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या २०२५ च्या महिला एकदिवसीय विश्वचषकात प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल सादरीकरण करताना दिसणार आहे.

  • 19 Sep 2025 02:54 PM (IST)

    19 Sep 2025 02:54 PM (IST)

    पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी स्वतःच सांगितली सौदी कराराची खरी कहाणी

    रियाधमध्ये नुकताच झालेला पाकिस्तान आणि सौदी अरेबियामधील संरक्षण करार गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. या करारानंतर अशी चर्चा सुरू झाली होती की पाकिस्तान आपल्या अणुशक्तीचा कवच सौदी अरेबियाला देईल का? पण पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी स्वतःच या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. इस्लामाबादमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की “सौदी अरेबियाला अणु कवच मिळणार नाही. हा करार केवळ संरक्षण आणि सुरक्षेसंदर्भात आहे. पाकिस्तान कोणत्याही परदेशी राष्ट्राला अण्वस्त्र उपलब्ध करून देऊ शकत नाही.”

  • 19 Sep 2025 02:45 PM (IST)

    19 Sep 2025 02:45 PM (IST)

    लष्कर कमांडरने ऑपरेशन सिंदूरसंदर्भात केला मोठा खुलासा

    ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने दिलेला धक्का पाकिस्तान नेहमीच लक्षात ठेवेल. याचदरम्यान आता जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी कमांडर इलियास काश्मिरी याने एक मोठा खुलासा केला आहे. ज्यामध्ये पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांचा पर्दाफाश करण्यात आला आहे. दरम्यान जैश-ए-मोहम्मदच्या एका दहशतवादी कमांडरने पाकिस्तानमध्ये एक मोठी कबुली दिली आहे. त्याने दावा केला आहे की, ऑपरेशन सिंदूरमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांना पाठवण्याचे आदेश थेट लष्करप्रमुखांनी दिले होते.

  • 19 Sep 2025 02:35 PM (IST)

    19 Sep 2025 02:35 PM (IST)

    निसर्ग काय ऐकेना! किन्नोरमध्ये ढगफुटी

    हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. किन्नोरमध्ये ढगफुटी झाली आहे. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेकडो गाड्या वाहून गेल्या आहेत. अनेक घरांचे मोठे नुकसान झाले आहे. किन्नोरमध्ये निसर्गाचा प्रकोप झाला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास थांच गावात तीन नद्यांची पातळी वाढली. त्यामुळे हजारो नागरिक प्रभावित झाले आहेत.

     

     

  • 19 Sep 2025 02:25 PM (IST)

    19 Sep 2025 02:25 PM (IST)

    प्रतिबंधित गुटखा–पान मसाल्याचा साठा उघड

    मिरा रोड परिसरात प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि सिगरेटची सर्रास विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. मिरा रोड रेल्वे स्टेशनच्या मागील बाजूस असलेल्या एसटी बसस्थानकाजवळील एका पानटपरीत मोठ्या प्रमाणात गुटखा व पान मसाल्याचा साठा आढळून आला.

  • 19 Sep 2025 02:15 PM (IST)

    19 Sep 2025 02:15 PM (IST)

    मशिदीतून घोषणा आणि नंतर हल्ला… क्षणार्धात अनेक दर्गे जळून खाक

    बांगलादेशातील धार्मिक सौहार्द पुन्हा एकदा रक्तरंजित घटनांनी हादरले आहे. हिंदू मंदिरांवर हल्ल्यांची मालिका थांबते की नाही, याची चिंता असतानाच आता सूफी दर्ग्यांवरही हिंसक जमावाने तोडफोड आणि जाळपोळ केली आहे. कुमिल्ला जिल्ह्यातील होमन उपजिल्ह्यात गुरुवारी झालेल्या या घटनांमध्ये तीन दर्गे जाळण्यात आले, एका निरपराध व्यक्तीचा मृत्यू झाला तर तब्बल २२ जण गंभीर जखमी झाले.

  • 19 Sep 2025 02:13 PM (IST)

    19 Sep 2025 02:13 PM (IST)

    Maharashtra Politics: “…. ते लक्षात घेत नाहीत”; फडणवीसांनी पडळकरांना ‘त्या’ वक्तव्यावरून खडसावलं

    Devendra Fadnavis On Gopichand Padalkar: महाराष्ट्राच्या राजकारणात रोज काही ना काही घडतंय आपल्याला पाहायला मिळत आहे. गोपीचंद पडळकर यांनी शरस पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्याबाबत एक वादग्रस्त विधान केले. त्यानंतर राज्यातचे राजकारण तापले आहे. जयंत पाटील यनहचयावर बोटळणा पडळकर यांची जीभ घसरली आहे. शरद पवार यांनी देखील मुख्यमंत्री फडणवीस यांना फोन केल्याचे समजते आहे. दरम्यान आता या सर्व प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे.

  • 19 Sep 2025 01:58 PM (IST)

    19 Sep 2025 01:58 PM (IST)

    भारताच्या राजकारणातही आले Gen-Z ?

    आपल्या शेजारील नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदीमुळे मोठे रान पेटले. नेपाळमध्ये Gen-Z च्या आंदोलनामध्ये मोठा विध्वंस झाला. अवघ्या काही तासांत सरकार कोसळले तर राजकीय नेत्यांना तरुणांनी पळून पळून मारले. राजकीय नेत्यांना त्यांचा पदभार सोडून देश सोडावा लागला. नेपाळी संतप्त तरुणांनी राजकीय नेत्यांची घरे पेटवून दिली आणि एका नेत्याच्या पत्नीला जीवंत जाळले. या आंदोलनामुळे  Gen-Z ची चर्चा संपूर्ण जगात रंगली. भारतामध्ये देखील आता Gen-Z ची चर्चा सुरु झाली असून भाजपच्या नेत्यांनी कॉंग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे.

  • 19 Sep 2025 01:55 PM (IST)

    19 Sep 2025 01:55 PM (IST)

    नांदेड येथे दोन गटात हाणामारीत सहा जखमी

    नांदेडच्या लोहा तालुक्यातील रिसनगाव गाव येथे दोन गटात हाणामारी झाली असून यात सहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर – नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. वादाचे कारण आतापर्यंत समजलेले नाही.

  • 19 Sep 2025 01:45 PM (IST)

    19 Sep 2025 01:45 PM (IST)

    तरुण शेतकऱ्याचा पाण्यात सोयाबीन करपल्याने टाहो

    बीड जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसाने शेती पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. गेवराई तालुक्यातील तांदळा गावातील तरुण शेतकऱ्याने आपलं सोयाबीन पाण्यात करपून गेल्याचं पाहून टाहो फोडला. सरकार मायबाप पन्नास हजार रुपये तरी मदत द्या. मेल्यावर आम्हाला दीड लाख रुपये देणाऱ्या मायबाप सरकारला विनंती आहे असं म्हणत टाहो फोडला.

  • 19 Sep 2025 01:43 PM (IST)

    19 Sep 2025 01:43 PM (IST)

    Himchal Cloudburst: निसर्ग काय ऐकेना! किन्नोरमध्ये ढगफुटी; शेकडो गाड्या गेल्या वाहून, लोकांनी जंगलाची…

    Kinnaur Heavy Rain Cloudburst: हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. किन्नोरमध्ये ढगफुटी झाली आहे. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेकडो गाड्या वाहून गेल्या आहेत. अनेक घरांचे मोठे नुकसान झाले आहे. किन्नोरमध्ये निसर्गाचा प्रकोप झाला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास थांच गावात तीन नद्यांची पातळी वाढली. त्यामुळे हजारो नागरिक प्रभावित झाले आहेत.

  • 19 Sep 2025 01:35 PM (IST)

    19 Sep 2025 01:35 PM (IST)

    लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात मोठी अपडेट

    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींना आता e-KYC करणं बंधनकारक करण्यात आल्याचं सांगितलं आहे. https://ladakibahin.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर e-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. शिवाय येत्या दोन महिन्यांच्या आत सदर e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

  • 19 Sep 2025 01:25 PM (IST)

    19 Sep 2025 01:25 PM (IST)

    पुण्यातील स्वारगेट भुयारी मार्ग 3 दिवस बंद राहणार

    पुणे शहरातील स्वारगेट परिसरातील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. स्वारगेट (कै. केशवराव जेधे चौक) येथील भुयारी मार्गाच्या दुरुस्तीचे काम आज (ता.19) रात्री 11:00 ते 22 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत चालणार आहे. या काळात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती पोलीस उप-आयुक्त (वाहतूक), पुणे शहर हिंमत जाधव यांनी दिली. तर वाहतुकीत बदल करत या दुरुस्ती कामाच्या काळात, स्वारगेट येथील भुयारी मार्गाने सारसबागकडे (अण्णाभाऊ साठे पुतळा मार्गे) जाणारा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. वाहनचालकांना भुयारी मार्ग सुरू होण्यापूर्वी डावीकडील रस्त्याने जेधे चौकाकडे जावे लागेल तेथून सारसबागकडे जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

  • 19 Sep 2025 01:15 PM (IST)

    19 Sep 2025 01:15 PM (IST)

    पुणे विद्यापीठाच्या शुल्कवाढी विरोधात विद्यार्थी काँग्रेसचं आंदोलन

    पुणे विद्यापीठाच्या शुल्कवाढी विरोधात विद्यार्थी काँग्रेसने आंदोलन करण्यात आलं आहे. परीक्षा शुल्कवाढी परिपत्रकाची होळी करून निषेध व्यक्त केला जाणार आहे. विद्यापीठाने परीक्षा शुल्कामध्ये 20 टक्के वाढ केल्याने विद्यार्थी काँग्रेसने त्याचा विरोध करण्यासाठी आंदोलन केलं आहे.

  • 19 Sep 2025 01:05 PM (IST)

    19 Sep 2025 01:05 PM (IST)

    राऊतांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका

    एकनाथ शिंदे यांची शिवसेना हा गृहमंत्री अमित शाह यांची मुंबईतील एटीएम मशिन आहे, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केली. ते पत्रकारांशी बोलत होते.

  • 19 Sep 2025 12:55 PM (IST)

    19 Sep 2025 12:55 PM (IST)

    नागपुरात राष्ट्रवादीचं चिंतन शिबिर सुरु

    भाजपच्या बालेकिल्ल्यात म्हणजे नागपुरात राष्ट्रवादीचं आज चिंतन शिबिर सुरु झाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निवडणूक पार्श्वभूमीवर पक्षाचा विस्तार करण्याचा राष्ट्रवादीचा हा प्रयत्न आहे. उपमुख्यमंत्री अजीत पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळांसह सर्व नेते,पदाधिकारी सहभागी झाले आहेत.

  • 19 Sep 2025 12:45 PM (IST)

    19 Sep 2025 12:45 PM (IST)

    राज ठाकरे आज ठाण्याच्या दौऱ्यावर

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज अंबरनाथ, कल्याणमध्ये दौरा आहे. अंबरनाथ , उल्हासनगर, बदलापूर या नगरपालिका महानगरपालिका निवडणुकीसाठी बैठक होत आहे. यात ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज ठाकरे यांचा हा पहिल्यांदाच ठाणे जिल्ह्या दौरा आहे.

  • 19 Sep 2025 12:43 PM (IST)

    19 Sep 2025 12:43 PM (IST)

    राष्ट्रवादी पक्षाला पुढे नेण्याचा निर्धार

    राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरात मंत्री छगन भुजबळ सहभागी झाले आहेत. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादी पक्षाला पुढे नेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. हल्ले होणार,मात्र घाबरून मागे हटता येणार नाही, असं सूचक विधान भुजबळांनी केले आ

  • 19 Sep 2025 12:08 PM (IST)

    19 Sep 2025 12:08 PM (IST)

    कॉंग्रेसकडून 'व्होट चोरी स्वाक्षरी' मोहिम सुरु

    कॉंग्रेसकडून संपूर्ण देशभरामध्ये वोट चोरी विरोधात आवाज उठवला जात आहे. यासाठी 'मत चोरी स्वाक्षरी' मोहिम कॉंग्रेसकडून सुरु करण्यात आली आहे. याची सुरुवात काँग्रेस सरचिटणीस आणि वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी यांनी स्वाक्षरी करुन केली आहे.

     

  • 19 Sep 2025 12:00 PM (IST)

    19 Sep 2025 12:00 PM (IST)

    इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पास राज्यस्तरीय तांत्रिक समितीची मंजुरी

    पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागातील सुमारे 50 लाख नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत असलेल्या आणि महाराष्ट्राच्या वारकरी सांप्रदायामध्ये श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला आता चालना मिळाली आहे. राज्य सरकारच्या नगर विकास विभागाच्या राज्यस्तरीय तांत्रिक समितीच्या (SLTC) मान्यतेचा प्रस्तावाला अखेर मान्यता मिळाली. त्यामुळे नदी सुधार प्रकल्पाचे काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला.

  • 19 Sep 2025 11:55 AM (IST)

    19 Sep 2025 11:55 AM (IST)

    HDFC बँकेच्या कर्मचारी अनुराधा वर्माचे सैनिकाशी अश्लील भाषेत गैरवर्तन

    HDFC बँकेच्या कर्मचारी अनुराधा वर्माचे सैनिकाशी अश्लील भाषेत गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. याचा ऑडिओ क्लिप समोर आला असून यामुळे नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.

    HDFC बँकेच्या कर्मचारी अनुराधा वर्माचे सैनिकाशी अश्लील भाषेत गैरवर्तन#HDFCBank #AnuradhaVerma #ViralVideo #HDFCBankControversy pic.twitter.com/sGoq18cpDK

    — Navarashtra (@navarashtra) September 18, 2025

  • 19 Sep 2025 11:25 AM (IST)

    19 Sep 2025 11:25 AM (IST)

    Iphone 17 घेण्यासाठी BKC मध्ये ग्राहकांची मोठी रांग

    आजपासून भारतात आयफोन17 सिरिजची विक्री सुरू होत असल्याने मुंबईतील बीकेसी येथील अ‍ॅपल स्टोअरमध्ये मोठ्या संख्येने लोक गर्दी करत आहेत.

    #WATCH | Maharashtra: A large number of people throng the Apple store in Mumbai's BKC as the company begins its iPhone 17 series sale in India from today pic.twitter.com/f6DOcZC5Yk

    — ANI (@ANI) September 19, 2025

  • 19 Sep 2025 11:15 AM (IST)

    19 Sep 2025 11:15 AM (IST)

    मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट

    हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील भेंडेगावात ही घटना घडली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याच्या वादातून दोन गटात बाचाबाची झाली. या प्रकरणी करुंदा पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल झाला.

  • 19 Sep 2025 11:05 AM (IST)

    19 Sep 2025 11:05 AM (IST)

    गोपींचद पडळकरांचे जयंत पाटलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य

    भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर अतिशय खालच्या भाषेत टीका केली आहे. पडळकर यांनी जयंत पाटील यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्या वडिलांचाही अपमान केला. या आक्षेपार्ह वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता या व्हिडीओवर राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

  • 19 Sep 2025 10:58 AM (IST)

    19 Sep 2025 10:58 AM (IST)

    8 महिलांना बनवले वासनेचे बळी

    कर्नाटकात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी योगगुरू निरंजन मूर्ती यांना पोलिसांनी अटक केली आहे. १७ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई केली. पोलिस तपासात असे दिसून आले की योगगुरूने इतर आठ महिलांवर लैंगिक अत्याचार केले होते आणि त्यांच्यावर बलात्कार केला होता. योगगुरूचा पर्दाफाश करणारी मुलगी योगा वर्गात जात होती. २०२३ मध्ये थायलंडच्या प्रवासादरम्यान मूर्ती यांनी तिचा छळ केल्याचा आरोप आहे. त्यांनी तिला पदके आणि प्लेसमेंटचे आश्वासनही दिले होते.

  • 19 Sep 2025 10:53 AM (IST)

    19 Sep 2025 10:53 AM (IST)

    अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांचा 60 वा वाढदिवस

    सुनीता विल्यम्स या भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर आहेत. त्यांनी केलेल्या शोध मोहिम आणि अवकाश मोहिमेमुळे सुनीता विल्यम्स या नेहमी चर्चेत राहिल्या आहेत. त्यांनी अंतराळात एकूण ६०८ दिवस आणि २० मिनिटांचे वास्तव्य केले आहे. तसेच, त्यांनी नऊ वेळा अंतराळ चाल (स्पेसवॉक) केल्या, ज्याचा एकूण वेळ ६२ तास आणि ६ मिनिटे आहे. हा वेळ महिलांमध्ये सर्वाधिक आणि एकूण चौथा क्रमांक आहे. सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी हे जेमतेम आठ दिवसांसाठी बोईंग स्टारलायनरच्या चाचणी मोहिमेसाठी, आंतरराष्ट्रीय आंतराळ केंद्र म्हणजेच इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये (ISS) येथे गेले होते. परंतु, तिथे जाऊन ते अंतराळामध्ये अडकले. तब्बल नऊ महिन्यांच्या अंतराळातील वास्तव्यानंतर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्या. आजच्या दिवशी 1965 साली त्यांचा जन्म अमेरिकेतील ओहायो राज्यातील युक्लिड सिटी (क्लीव्हलँडमध्ये स्थित) येथे झाला होता.

  • 19 Sep 2025 10:46 AM (IST)

    19 Sep 2025 10:46 AM (IST)

    मोहम्मद आमीरची सोशल मिडिया पोस्ट व्हायरल!

    १४ सप्टेंबर २०२५ रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक सामना झाला. टीम इंडियाने ७ विकेट्सने विजय मिळवला आणि पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न करता ड्रेसिंग रूममध्ये गेली. तेव्हापासून, नो-हँडशेक वाद चर्चेचा विषय बनला आहे. माजी पाकिस्तानी खेळाडू भारतीय खेळाडूंवर टीका करत असताना, मोहम्मद आमिरचा एक ट्विट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने विराट कोहलीचे कौतुक केले आहे.

    Mohammad Amir's Tweet on Virat Kohli pic.twitter.com/Nv4PfeyEWg

    — Ujjaval Palanpure (@ujjaval___) September 19, 2025

  • 19 Sep 2025 10:45 AM (IST)

    19 Sep 2025 10:45 AM (IST)

    राजस्थानमध्ये वर्दीतील पोलिसांना मारहाण

    राजस्थानमध्ये वर्दीतील पोलिसांना मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून यावरुन आपने टीका केली आहे. आम आदमी पक्षाने व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे की, राजस्थानमधील एका गावात, गुन्हेगारी रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांना ग्रामस्थांनी बेदम मारहाण केली. भाजपशासित राजस्थानमध्ये, गुन्हेगारांना पोलिसांची किंवा कायद्याची भीती नाही. लोकांना माहित आहे की त्यांनी काहीही केले तरी सरकार इतके अक्षम आहे की काहीही होणार नाही.

    राजस्थान के एक गांव में ग्रामीणों ने पुलिसवालों को जमकर पीट दिया, क्योंकि वह अपराध रोकने गए थे।

    BJP शासित राजस्थान में अपराधियों के मन में पुलिस और कानून का कोई ख़ौफ़ ही नहीं है। लोगों को मालूम है कि कुछ भी कर लो, सरकार इतनी निकम्मी है कि कुछ होगा ही नहीं। pic.twitter.com/sIStgB9z2K

    — AAP (@AamAadmiParty) September 18, 2025

Web Title: Top marathi news today breaking news political news live update crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2025 | 09:29 AM

Topics:  

  • Breaking News
  • political news
  • Top Marathi News Today

संबंधित बातम्या

भाजपवर टीका करुन शहाजी बापू पाटील फसले? चौकशीचा ससेमिरा अन् विरोधकांचे टीकास्त्र
1

भाजपवर टीका करुन शहाजी बापू पाटील फसले? चौकशीचा ससेमिरा अन् विरोधकांचे टीकास्त्र

बुलडाण्यात पकडले गेले २ बनावट मतदार, बऱ्याच ठिकाणी EVM खराब, कशी आहे मतदानाची स्थिती
2

बुलडाण्यात पकडले गेले २ बनावट मतदार, बऱ्याच ठिकाणी EVM खराब, कशी आहे मतदानाची स्थिती

Maharashtra Nagarparishad Voting Live:  3 डिसेंबरची मतमोजणी रद्द, या दिवशी लागणार निकाल
3

Maharashtra Nagarparishad Voting Live: 3 डिसेंबरची मतमोजणी रद्द, या दिवशी लागणार निकाल

Maharashtra Local Body Elections : वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या मतदान; प्रशासनाची तयारी पूर्ण
4

Maharashtra Local Body Elections : वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या मतदान; प्रशासनाची तयारी पूर्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.