आजच्या ब्रेकिंग न्यूज अपडेट
नाशिकमध्ये गुन्हेगारी वाढत चालल्याचं दिसून येत आहे. आता पुन्हा एक नाशिकमध्ये हत्या झाल्याचं समोर आला आहे. १९ वर्षीय मुलाची हत्या झाल्याचं समोर आला आहे. युवक आपल्या वडिलांसोबत भाजीपाला आणायला गेला होता. पैश्याच्या किरकोळ वादावरून या मुलाची धारधार हत्याराने वार करून हत्या करण्यात आली.
29 May 2025 04:53 PM (IST)
आशियाई बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (२९ मे) भारतीय शेअर बाजार अस्थिर व्यापारात वरच्या पातळीवर बंद झाला. व्यापाराच्या शेवटच्या अर्ध्या तासात जोरदार खरेदीमुळे प्रमुख बेंचमार्क निर्देशांक निफ्टी-५० आणि सेन्सेक्सने उसळी घेतली आणि हिरव्या रंगात बंद झाले. पूर्वी बाजार बहुतेक वेळा सपाट किंवा लाल रंगात व्यवहार करत होता.
29 May 2025 04:46 PM (IST)
नाशिकमध्ये दर १२ वर्षांनी कुंभमेळा भरतो. प्रयागराज येथील कुंभमेळ्यानंतर आता आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२६-२७ मध्ये नाशिक येथे होणार आहे. रविवार, १ जून रोजी यासंदर्भातील एक महत्त्वपूर्ण बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात येणार आहे. या बैठकीचे अध्यक्षस्थान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भूषवतील.
29 May 2025 04:20 PM (IST)
कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या अहवालानुसार, भारतातील प्रमुख शहरांमध्ये व्यावसायिक रिअल इस्टेट बाजार मजबूत आहे. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये कार्यालयीन जागेचा भाडेपट्टा चांगला राहिला, ज्यामुळे रिक्त जागा कमी झाल्या आणि व्याप्ती वाढली. मार्च २०२५ पर्यंत टॉप ७ शहरांमधील एकूण ऑफिस स्पेस ७०७ दशलक्ष चौरस फूटपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत ७ टक्के जास्त आहे.
29 May 2025 04:11 PM (IST)
काजोलच्या 'मां' चित्रपटाचा भयानक ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या २ मिनिट २४ सेकंदांच्या ट्रेलरमध्ये असे अनेक दृश्य आहेत, जे प्रेक्षकांना धक्का देण्यासाठी आणि घाबरवण्यासाठी पुरेसे आहेत. या चित्रपटात एका राक्षस आणि आईमधील लढाई दाखवण्यात आली आहे. आई आपल्या मुलीसाठी किती प्रमाणात समोरच्याचा विनाश करू शकते हे काजोलच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतरच तुम्हाला हे समजेल. 'मां'च्या ट्रेलरमध्ये असे अनेक भयानक दृश्ये आहेत, जे चाहत्यांना चित्रपट पाहण्यासाठी उत्साहित करू शकतात.
Rakshak. Bhakshak. MAA.
The protector. The destroyer. #MaaTrailer out now - https://t.co/rwdVSDRW9O
In cinemas 27th June. #MaaTheFilm@RonitBoseRoy #IndraneilSengupta #KherinSharma @jitin0804 @jiostudios @ADFFilms @TSeries @ajaydevgn #JyotiSubbarayan @KumarMangat @FuriaVishal… pic.twitter.com/actty2EdUz— Kajol (@itsKajolD) May 29, 2025
29 May 2025 03:29 PM (IST)
जेव्हा जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नवीन शुल्क लादण्याची धमकी देतात तेव्हा त्याचा परिणाम अमेरिकेसह जागतिक बाजारपेठेत दिसून येतो. पण आता गुंतवणूकदारांमध्ये एक मजेदार आणि उपयुक्त ट्रेंड सुरू झाला आहे – TACO, अर्थात ‘ट्रम्प ऑलवेज चिकन आऊट’ असा होतो. हा शब्द एका वृत्तसंस्थेच्या स्तंभलेखकांनी तयार केला होता. ट्रम्प प्रथम मोठ्या प्रमाणात शुल्क आकारण्याची धमकी देतात परंतु नंतर अनेकदा यू-टर्न घेतात किंवा एकतर निर्णय पुढे ढकलतात किंवा बदलतात.
बाजारातील या गोंधळाचा फायदा हुशार गुंतवणूकदार घेत आहेत. बाजार पडताच, ते स्वस्त दरात शेअर्स खरेदी करतात आणि नंतर टॅरिफ मागे घेण्याची बातमी येताच नफा कमावतात. ट्रम्प यांनी दिलेली प्रत्येक टॅरिफ धमकी आता काही लोकांसाठी कमाईची संधी बनली आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
29 May 2025 02:38 PM (IST)
दक्षिण कोरियामध्ये एक विमान दुर्घटना घडली आहे. दक्षिण कोरियाच्या नौदलाचे गस्त घालणारे विमान पी-३ पोहांगच्या डोंगराळ परिसरात कोसळले. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या विमानामध्ये चार लोक होते. परंतु अद्याप त्यांच्या बद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दक्षिण कोरियाच्या नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (२९ मे) दुपारी ही घटना घडली. सध्या अग्निशमन दलाने मदत आणि बचाव कार्य सुरु केले आहे.
29 May 2025 02:23 PM (IST)
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर वादात सापडलेला निलेश चव्हाण याला फरार होणे महागात पडणार आहे. पुणे पोलिसांनी चव्हाण याची मालमत्ता जप्त करण्याची तयारी सुरु केली आहे.
29 May 2025 01:45 PM (IST)
भाजप आमदार भीमराव तापकीर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. सहकारनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे.
29 May 2025 01:30 PM (IST)
काँग्रेसचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांचा शिवसेना शिंदे गटातील प्रवेश रखडला आहे. 31 मे रोजी त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. तो आता 5 जून रोजी होणार आहे, अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचे लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे यांनी दिली. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे निकटवर्तीय असलेले सिद्धाराम म्हेत्रे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
29 May 2025 01:14 PM (IST)
कोल्हापूरमध्ये आमदार राजेश क्षीरसागर यांच्याविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. पाच कोटी रुपये खर्च करूनही गांधी मैदानाला तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे, असा आरोप करत याच पाण्यात आंदोलक बोटी सोडणार आहेत. तसेच क्षीरसागर यांचाही फोटो विसर्जित केला जाणार आहे.
29 May 2025 01:00 PM (IST)
गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसाने बळीराजा अडचणीत आला असून, उन्हाळी पिकांना मोड आले आहेत. या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. निसर्गाची फिरलेली चक्रे आता शेतकऱ्यांच्या नुकसानीला कारणीभूत ठरली आहेत. 'धो-धो आला अन् सगळेच धुवून गेला' अशी परिस्थिती कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची झाली आहे.
29 May 2025 12:48 PM (IST)
डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाला पुन्हा एकदा अमेरिकेच्या न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेन न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरु केलेल्या लिबरेशन डे टॅरिफला स्थगिती दिली आहे. न्यायालयाने ट्रम्प यांचा निर्णय असंवैधानिक असल्याचे म्हटले आहे.
29 May 2025 12:41 PM (IST)
भारतीय जनता पक्षसोबत जाण्याची काहींना तहान लागली आहे. सुप्रिया सुळे यांच नाव तुम्ही वारंवार घेताय किंवा अन्य काही नेत्त्यांची नाव घेताय. त्यांना तहान नक्कीच लागली असेल पण तहान लागली म्हणून कोणी गटाराचे पाणी नाही पित. सहकार क्षेत्रात आल्यामुळे तहान जरी लागली असेल तरी कुठे उडी मारायची हे त्यांना माहीत आहे. काहींना तहान नक्कीच लागली असेल पण तहान लागली म्हणून गटारातलं पाणी कोणी पीत नाही. जे केलेले आहेत ते धडपडत आहेत प्रत्येकाला त्यांचा अस्तित्व शोधावं लागेल
29 May 2025 12:30 PM (IST)
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) त्यांच्या कोट्यवधी सदस्यांसाठी नियमांमध्ये मोठा बदल करणार आहे. लवकरच एक नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म EPFO 3.0 लाँच होणार आहे. याद्वारे एटीएममधून पीएफ काढणे, डिजिटल सुधारणा इत्यादी अनेक बँकिंग कामे सोपी आणि पारदर्शक होतील. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी याबाबत माहिती दिली होती. त्यांनी म्हटले होते की, ईपीएफओ ३.०९ कोटींहून अधिक ग्राहकांसाठी एक विश्वासार्ह व्यासपीठ म्हणून काम करेल. ज्यामध्ये अनेक सुविधा उपलब्ध असतील. त्याचा सर्वात मोठा फायदा असा होईल की आता पीएफ खात्यातील पैसे एटीएममधूनही काढता येतील.
29 May 2025 12:03 PM (IST)
भारताच्या पुरुष दुहेरी जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी बुधवारी सिंगापूर ओपन सुपर बॅडमिंटन स्पर्धेत विजयी पुनरागमन केले आहे. तर लक्ष्य सेनला मात्र पाठीच्या दुखापतीमुळे सामन्यातून बाहेर जावे लागले.
29 May 2025 12:02 PM (IST)
आज सकाळी हिरव्या रंगात उघडलेला शेअर बाजार आता तो रेड झोनमध्ये आहे. ८१८१६ वर पोहोचल्यानंतर, सेन्सेक्स आता ७१ अंकांनी घसरून ८१२४० वर पोहोचला आहे. २४८८९ च्या पातळीला स्पर्श केल्यानंतर निफ्टी देखील २४७१४ वर आला. यामध्ये ३७ अंकांची घसरण झाली आहे. एनएसई वर २७७१ स्टॉकचे व्यवहार होत आहेत. यापैकी १२६४ हिरव्या चिन्हावर आणि १२४२७ लाल चिन्हावर व्यवहार करत आहेत.
29 May 2025 11:36 AM (IST)
PBKS vs RCB : आयपीएल २०२५ चा पहिला क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामने २९ आणि ३० मे रोजी पंजाबमधील मुल्लानपूर येथे खेळवले जाणार आहे. या पार्श्वभूमिवर पंजाब पोलिसांकडून कडेकोट सर्व सुरक्षा व्यवस्था केली आहे.
29 May 2025 11:20 AM (IST)
मे महिन्यात सुमारे दहा दिवस झालेल्या मुसळधार पावसाने उंब्रज विभागातील वीट भट्टी व्यवसायांना मोठा फटका बसला असून, ९० वीट भट्टींचे सुमारे तीन कोटींवर नुकसान झाले आहे. यामुळे वीटभट्टी चालक-मालक हाताश झाला असून, नुकसान भरून कसे काढायचे हा प्रश्न वीट व्यावसायिकांसमोर उभा झाला आहे.
29 May 2025 11:11 AM (IST)
गुरुवारी सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी उलथापालथ झाली. अमेरिकेतील एका बातमीनंतर सोन्यात मोठी घसरण झाली. त्याच वेळी, चांदी थोडीशी वाढून उघडली, परंतु त्यानंतरच्या तासाभरात यामध्ये मोठा बदल झाल्याचे दिसून आले. ६०० रूपयांनी सोने घसरले असून आज खरेदी करू शकता
29 May 2025 10:50 AM (IST)
मुंबई इंडियन्स आयपीएल २०२५ च्या प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. ३० मे रोजी एलिमिनेटरमध्ये मुंबईचा सामना गुजरात टायटन्ससोबत खेळवला जाणार आहे. परंतु, २८ मे रोजी मुंबईचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवने एक पोस्ट करून खळबळ उडवून दिली आहे. ज्यामुळे चाहत्यांना धक्का बसला होता. काय आहे सत्य वाचा मुख्य बातमीत
29 May 2025 10:45 AM (IST)
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि काजोल-राणी मुखर्जी यांचे काका रोनो मुखर्जी यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. रोनो मुखर्जी हे एका प्रसिद्ध चित्रपट कुटुंबातील होते आणि ते बऱ्याच काळापासून चित्रपटांशी जोडले गेले होते. ते काजोल, राणी मुखर्जी आणि दिग्दर्शक अयान मुखर्जी यांचे काका होते. रोनो मुखर्जी यांच्या निधनाच्या बातमीने शोक पसरला आहे. तसेच त्यांच्या अंत्यसंस्कारच्या वेळीस अनेक बॉलिवूड कलाकारांची उपस्थिती दिसली.
29 May 2025 10:27 AM (IST)
सहा दिवसांपासून राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस असतानादेखील ‘लालपरी’ने एक कोटी नऊ लाख किलोमीटर प्रवास केला आहे. ८३ लाख प्रवाशांनी दोन दिवसांत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या १४ हजार ३४१ बसगाड्यांमधून प्रवास केला आहे. त्यातून महामंडळाला ६३ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
29 May 2025 10:23 AM (IST)
आज २९ मे रोजी पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ही दोन संघ आमनेसामने असणार आहेत. जो कोणी हा सामना जिंकेल तो थेट आयपीएल २०२५ च्या अंतिम फेरीमध्ये धडक मारेल. हा महत्त्वाचा सामना मुल्लानपूरमधील महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होणार आहे.
29 May 2025 10:22 AM (IST)
सेन्सेक्स 450 अंकांनी वाढून 81,751 च्या आसपास होता. बँक निफ्टी देखील 250 अंकांनी वधारला होता. अमेरिकेतून येणाऱ्या दरवाढीच्या बातम्यांमुळे आयटी आणि धातू शेअर्समध्ये तेजी दिसून आली. निफ्टीवरील आयटी निर्देशांक 1 टक्क्यांच्या वर होता.