मुंबई – आगामी मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. पालिकेता मागील वीस-पंचवीस वर्षापासून शिवसेनेचे सत्ता आहे. मात्र मागील पाच वर्षात पालिकेनं केलेल्या विविध 12 हजार कामांची चौकशी कॅगकडून (CAG) होणार आहे. अशी माहिती भाजपा आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत (Ashish Shelar press conference) दिली. यावेळी त्यांनी पालिका कंत्राटी कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार झाल्याचा देखील आरोप केला आहे. दरम्यान, कॅगच्या या चौकशीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडून परवानगी आली असल्यांच शेलार यांनी सांगितले.
[read_also content=”उद्योगपती गौतम अदानी जागतिक श्रीमंताच्या यादीत तिसऱ्या स्थानावर https://www.navarashtra.com/india/industrialist-gautam-adani-is-third-in-the-list-of-world-richest-people-340583.html”]
दरम्यान, शेलार यांनी यावेळी पालिकेत विविध कामांचा मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी दहा महत्त्वाच्या कामांची यादीच वाचून यावेळी दाखवली. 10 विभागात 12 हजार कोटींची कंत्राट दिली गेली, चार पुलांचं काम 1 हजार 496 कोटी दिलं गेल. कोरोनाकाळात तीन रुग्णालयातील खरेदी 904 कोटी एवढी झाली आहे. 56 रस्त्यांची दुरुस्तीसाठी 2 हजार 286 कोटी रुपये लागले. चार पुलांसाठी मोठा निधी वापरला गेला आहे. सांडपाणी प्रकल्पासाठी 1 हजार 84 कोटी, तीन मलनि:सारण प्रक्रिया केंद्रासाठी 1 हजार 187 कोटी, दहीसरमधील भूखंडाची खरेदी 339 कोटी, घनकचार व्यवस्थापन 1 हजार 20 कोटी एवढा खर्च आला आहे. तसेच ही कामे दिलेले कंत्राटदार आणि कंपन्याही बोगस होत्या असा आरोप शेलारांनी पालिका प्रशासनावर केला आहे. मुंबई पालिकेच्या कामांचं कॅगकडून लेखापरिक्षण होणार आहे, या सर्व कामांची कॅगकडून चौकशी होणार असल्याचं शेलार म्हणाले.