महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन 577 मतांनी विजयी
22 Jun 2026 12:24 PM (IST)
बॅंकॉकहून पुण्यात विमानाद्वारे आलेल्या एका बेवारस बॅगेत तब्बल साडे एक्केवीस किलो हायड्रोपोनिक गांजा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या गांजाची किंमत तब्बल अडीच कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करी रॅकेटचा हात असल्याचे सांगितले जात असून, विमानतळावर सीमाशुल्क (कस्टम) विभागाने मोठी कारवाई करत हा हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे.
22 Jun 2026 12:12 PM (IST)
हांडेवाडीतील तरुणाच्या खून प्रकरणाचा छडा पोलिसांनी दोन तासात लावला आहे. खून करुन पसार झालेल्या एकाला काळेपडळ पोलिसांनी अटक केली आहे. आकाश मारुती झांबरे (वय ३१, रा. झांबरे तालीम चौक, होळकरवाडी, ता. हवेली) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी आकाश उर्फ आत्या अशोक भरेकर (वय ३१, रा. झांबरे तालीम चौक, होळकरवाडी, ता. हवेली) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत झांबरे याचा चुलतभाऊ रवींद्र जालिंदर झांबरे यांनी काळेपडळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
22 Jun 2026 11:55 AM (IST)
भाजपचे दिग्गज नेते आणि अधिकृत उमेदवार बसवराज पाटील यांनी विरोधकांना चारीमुंड्या चित करत तब्बल ७१९ मतांचे विक्रमी मताधिक्य मिळवून दणदणीत विजय साकारला आहे. त्यांनी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार महेश देशमुख यांचा अत्यंत दारुण पराभव केला असून, निकाल जाहीर होताच धाराशिव शहरातून भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी विजयी उमेदवाराची ढोल-ताशांच्या गजरात भव्य विजयी मिरवणूक काढली आहे.
22 Jun 2026 11:50 AM (IST)
भंडारा गोंदिया प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे अविनाश ब्राह्मणकर विजयी झाले आहेत. त्यांना 302 मध्ये मिळाली तर महाविकास आघाडी समर्थित उमेदवार नरेश ईश्वरकर यांना 154 मते मिळाली. मतदार संघामध्ये एकूण 457 मतदार नोंदणी झाली होती. निवडणुकीत 100 टक्के मतदान झाले. यात एक मत अवैध पडले. 148 मतांनी महायुतीचे ब्राह्मणकर विजयी झाले.
22 Jun 2026 11:40 AM (IST)
सोलापूरः विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत (भाजप) यांनी विजय मिळवला. राऊत यांनी राष्ट्रवादीचे (शरद पवार) पक्षाचे उमेदवार वसंत देशमुख यांचा ३६५ मतांनी पराभव केला. या निवडणुकीत १३ मते बाद ठरली. वसंत देशमुख यांना ११८ मते मिळाली.
22 Jun 2026 11:35 AM (IST)
काँग्रेसची स्वतःची 170 मते होती आणि महाविकास आघाडीची एकूण 211 मते असतानाही अतुल लोंढे यांना फक्त 130 मते मिळाली. याचाच अर्थ काँग्रेसच्या किमान 40 नगरसेवकांनी आणि महाविकास आघाडीच्या इतर मित्रपक्षांच्या मतदारांनी भाजपच्या उमेदवाराला साथ दिली. पराभूत उमेदवार अतुल लोंढे यांनी भाजपवर खळबळजनक आरोप केले आहेत. त्यांच्या दाव्यानुसार, भाजपने प्रत्येकी 10 लाख रुपये देऊन 100 मतदारांची 'क्रॉस वोटिंग' करून घेतली.
22 Jun 2026 11:30 AM (IST)
राज्याचं लक्ष लागलेल्या सांगली सातारा विधान परिषदेचा निकाल जाहीर झाला असून भाजपच्या धैर्यशील कदम यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा मोठा पराभव केला आहे. धैर्यशील कदम यांनी 593 मतं मिळवत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांचा 301 मतांनी पराभव केला. अभयसिंह जगताप यांना 292 मतं मिळाली आहेत.
22 Jun 2026 11:21 AM (IST)
गोकुळ गीते यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केल्यानंतर उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी मुंबईत बोलावून घेतले आहे. गोकुळ गीते यांना आज सायंकाळी 3 ते 4 वाजताच्या दरम्यान एकनाथ शिंदेंनी मुंबईत बोलावले आहे. तसेच गोकुळ गीते यांच्यासाठी एकनाथ शिंदे विमान देखील पाठवणार आहेत.
22 Jun 2026 11:12 AM (IST)
नाशिक विधान परिषदेसाठी एकूण 618 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतमोजणीदरम्यान यातील 13 मते अवैध ठरवण्यात आली. त्यामुळे एकूण 605 मते वैध ठरली. या वैध मतांच्या आधारे विजयासाठी 303 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. या मतमोजणीत अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी तब्बल 357 मते मिळवत विजयाचा टप्पा सहज पार केला. पहिल्याच फेरीत गोकुळ गीते यांनी 303 चा कोटा पार केल्यामुळे त्यांचा विजय निश्चित झाला.
22 Jun 2026 11:08 AM (IST)
नांदेड:अमर राजूरकर 339, कृष्णा पाटील आष्टीकर 84 लातूर बीड धाराशिव: बसवराज पाटील 845 महेश देशमुख 124 परभणी हिंगोली: सईद खान 242, डॉ. विवेक नावंदर -० जालना छत्रपती संभाजीनगर: सुहास शिरसाट 454, गणेश लोखंडे 124
22 Jun 2026 11:06 AM (IST)
लातूर बीड धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजप महायुतीच्या बसवराज पाटील यांचा विक्रमी मतांनी विजय
22 Jun 2026 11:06 AM (IST)
सांगली-सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीत माझा पराभव झाला असला तरी ही लढाई सुरूच राहील,आमदारकी साठी माझी निवडणूक नव्हती लोकशाही वाचवण्यासाठी माझी लढाई सुरू होते, अशी भावना सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीतील महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार अभयसनीय जगताप यांनी व्यक्त केली आहे.
22 Jun 2026 11:05 AM (IST)
नाशिकमध्ये महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभ अत्यंत धक्कादायक आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते गिरीश महाजन यांनी दिली आहे. विश्वासघाताची आमची संस्कृती नाही रक्तातच नाही, असंही महाजन यांनी म्हटलं आहे.
22 Jun 2026 11:05 AM (IST)
सोलापुरातून भाजपचे राजेंद्र राऊत यांचा विजय झाला आहे. राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) वसंतराव देशमुख यांचा पराभव केला आहे.
Marathi Breaking News Updates : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल (Vidhan Parishad Election Result 2026) जाहीर झाला आहे. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी 18 जून रोजी निवडणूक पार पडली होती. मात्र या निवडणुकीआधीच 17 पैकी 6 ठिकाणी महायुतीचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले होते. त्यामुळे आज उरलेल्या 11 जागांचा निकाल समोर आला. 17 पैकी 16 जागांवर महायुतीचा विजय झाला आहे.






