या प्रकारांमुळे विद्यार्थिनी, पालक आणि नागरिकांमध्ये चिंता व नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे या पार्श्वभूमीवर वाई पोलिसांनी अशा रोडरोमिओंवर करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली असून, शैक्षणिक परिसरात विनाकारण फिरणाऱ्या टोळक्यांवर तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. “कायदा हातात घेणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही. कारवाई करताना कोणाचीही गय केली जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे आणि पोलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी दिला विद्यार्थिनींची छेडछाड, शेरेबाजी, विनाकारण पाठलाग, टोळक्याने दहशत निर्माण करणे, बेदरकार वाहनचालक तसेच ध्वनीप्रदूषण करणाऱ्या दुचाकीस्वारांवर पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे अशा प्रवृत्तीच्या युवकांनी वेळीच आपले वर्तन सुधारावे, अन्यथा कायद्याचा दणका बसल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा पोलिसांनी दिला आहे दरम्यान, शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात संशयास्पद हालचाली, रोडरोमिओंचा त्रास किंवा विद्यार्थिनींची छेडछाड होत असल्यास पालक, शिक्षक आणि नागरिकांनी तातडीने वाई पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. विद्यार्थिनींची सुरक्षितता आणि शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी रोडरोमिओंविरोधात पोलिसांची कारवाई आता अधिक तीव्र होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे म्हणाले की, अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास देणाऱ्या पालकांवरती ही गुन्हे दाखल करणार अल्पवयीन मुले वाहन चालवताना बेधारकपणे वाहन चालवतात त्यामुळे अपघाताचा धोका संभवतो तसेच स्टॅन्ड परिसरात मोठ्या प्रमाणात युवकांची किरकोळ बाचाबाची भांडणे चालू असता त्यावर आम्ही रोज कारवाया करत असून जर त्यामध्ये फरक पडला नाही तर संबंधित राडा करणाऱ्या युवकांवर गुन्हे दाखल करणार.
Buldhana News: जिल्हा बँक निवडणुकीचा फैसला; ९४ टक्के मतदान; अनेक मान्यवरांनी बजावला आपला मताधिकार






