मुंबई – आज चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेताना त्यांना संजय राठोडांविषयी प्रश्न विचारला असता, त्या पत्रकारावर भडकल्या. दरम्यान, आधी जे आरोपी असतात ते भाजपात गेल्यावर पवित्र होतात का? असा सवाल यानिमित्ताने समोर येत आहे. यावरुन आता शिवेसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी भाजपाचा चांगलाच समाचार घेतला आहे. भाजपामध्ये गेल्यावर सर्व विषय संपतात, भाजपासोडून दुसरीकडे गेल्यावर विषय सुरु होतात, अशी बोचरी टिका भाजपावर सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केली आहे. भाजपासोडून गेले की, फाईली खुली करण्यात येतात. माजी मंत्री संजय राठोडांना क्लिनचीट कोणत्या आधारावर दिली? संजय राठोडांचा विषय संपला कसा? राठोडांना कोणत्या आधारावर क्लिनचीट देण्याती आली? असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.
[read_also content=”काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे सहभागी https://www.navarashtra.com/maharashtra/yuvasena-chief-aditya-thackeray-participates-in-bharat-jodo-yatra-in-hingoli-343726.html”]
दरम्यान, आज यवतमाळमध्ये चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी पत्रकार परिषद घेताना, त्यांना संजय राठोडांबद्दल प्रश्न विचारला असता, त्या पत्रकारावर भडकल्या. तसेच तुम्ही कोण न्यायालय आहात का? तुम्ही संजय राठोडांचं करिअर बर्बाद केलं आहे, असल्या पत्रकारांना बोलावता कशाला? असं चित्रा वाघ भडकल्या. दरम्यान, आज सकाळी सुषमा अंधारे यांनी किरीट सोमय्यांवर टिका करताना भावना गवळी, प्रताप सरनाईक व यशवंत जाधव यांच्याविषयी आधी किरीट सोमय्या माफिया-माफिया असे बोलत होते. मात्र, आता चिडीचूप आहेत, या सर्वांना क्लीन चिट मिळालेली नाही. त्यामुळं त्यांची चार्जशिट कधी दाखल होणार, याचे उत्तर किरीट सोमय्या यांनी द्यावे. सध्या सोमय्यांची अवस्था म्हणजे “आपला तो फेकू आणि दुसऱ्याचा तो पप्पू” अशी आहे. अशी टिका केली आहे. त्यामुळं सुषमा अंधारेंच्या टिकेला चित्रा वाघ कसं उत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.