मुंबई : मागील आठवड्यात शिवसेनेच्या दिपाली सय्यद (Deepali Syed) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची (Eknath Shinde) भेट उद्धव ठाकरे (Udhav Thackreay) व शिंदे यांच्यात समेट घडविण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र येणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांच्या ट्वीटनंतर (Tweet) या चर्चांना जास्त जोर धरला आहे. यावर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच यावेळी त्यांनी दीपाली सय्यद यांच्यावर टिका सुद्धा केली आहे.
[read_also content=”मोबाईल कॅमेरा वापरता येत नाही? मग ‘हे’ नक्की वाचा https://www.navarashtra.com/technology/cant-use-the-mobile-camera-use-this-tips-nrrs-305081.html”]
दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर दिपाली संय्यद यांनी ट्विट केले आहे. व या दोघ एकत्र यावे अशी तमाम शिवसैनिकांची इच्छा आहे, तसच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर येतील असं ट्विटमध्ये म्हटले होते. यानंतर राऊतांनी काही सवाल उपस्थित करत सय्यद यांच्यावर टिका केली आहे. अशा प्रकारची वक्तव्यं खूप काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे. हे एकत्र होईल का हे येणारा काळ ठरवेल. ते आमचेच सहकारी, आमचेच मित्र आहेत. इतकी वर्ष आम्ही काम केले आहे. दिपाली सय्यद अभिनेत्री आहेत. पक्षाचे काम करतात. त्यांना हे अधिकार कोणी दिले याची मला माहिती नाही असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे, यामुळं याला आता दीपाली सय्यद यांच्याकडून काय उत्तर येते हे पाहावे लागेल.