कल्याण : पाच वर्षापूर्वीचे प्रेमसंबंध असून महिला त्याच्यासोबत राहण्यास तयार नाही. त्यामुळे लॉजमध्ये बोलवून ज्योती तोरडमल हिची हत्या करण्यात आली. महात्मा फुले पोलिसांनी आठ तासात आरोपी भूपेंद्र गिरी याला बेड्या ठोकल्या आहेत.
कल्याण पश्चिमेतील तृप्तीचा लॉजमध्ये ज्योती तोरडमल हिचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरु केला. डीसीपी सचीन गुंजाळ, एसीपी कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक शैलेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु केला. आरोपी भुपेंद्र गिरीचा शोध सुरु केला होता. भूपेंद्र आणि ज्योती हे दोघे शनिवारी ३ वाजता तृप्तीला घेऊन लॉजमध्ये आले होेते. रविवारी सकाळी ज्योती हिचा गळा आवळून भूपेंद्र हा पसार झाला होता. लॉजमधील मोबाईल नंबर पोलिसांना मिळाला होता. तांत्रिक पद्धतीने तपास करुन पोलिसांनी भूपेंद्र याचा पाठलाग सुरु केला. सोलापूर उस्मानाबाद हायवेवर तो एका ठिकाणी सापडला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
या प्रकरणात पोलिस सूत्रांनी माहिती दिली आहे की, ज्योती आणि भूपेंद्र यांचे पाच वर्षापासून प्रेमसंबंध होते. भूपेद्र हा विवाहित होता. त्याची पत्नीचा मृत्यू झालेला आहे. ज्योती देखील एका व्यक्तीसोबत कल्याण पूर्वेत राहते. जेव्हा ज्योती भूपेंद्रला भेटण्यासाठी तृप्ती लॉजमध्ये आली. तेव्हा त्याने तिच्याकडे एक अट ठेवली. तु माझ्यासाेबत चल आणि माझ्यासोबत रहा. परंतू ज्योती तयार नव्हती. या कारणावरुन दोघांचा वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की त्याने ज्योतीचा गळा आवळला. त्यानंतर तोंडावर उशी ठेवून तिला जीवे ठार मारले.