(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर नुकतीच एक नवीन अॅनिमेटेड मालिका प्रदर्शित झाली असून, तिने रिलीज होताच प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा निर्माण केली आहे. ही मालिका म्हणजेच ‘कुरुक्षेत्र’, जी सध्या नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंग नंबर 1 वर झळकत आहे आणि प्रेक्षकांनी तिला भरभरून प्रतिसाद दिला आहे.
‘कुरुक्षेत्र’ नेटफ्लिक्सची पहिली भारतीय पौराणिक अॅनिमेटेड सिरीज
‘कुरुक्षेत्र’ ही नेटफ्लिक्स इंडियाची पहिली पौराणिक अॅनिमेटेड मालिका आहे. ही मालिका महाभारताच्या युद्धावर आधारित असून, त्यातील घटनांना आधुनिक अॅनिमेशनच्या माध्यमातून नव्या पद्धतीने सादर करण्यात आलं आहे. या मालिकेचे लेखन अनु सिक्का यांनी केलं असून, दिग्दर्शन उजान गांगुली यांनी केलं आहे. या अॅनिमेटेड मालिकेसाठी अनेक कलाकारांनी आपले आवाज दिले आहेत. ‘कुरुक्षेत्र’ने प्रेक्षकांमध्ये विशेष स्थान निर्माण केलं आहे. उत्कृष्ट अॅनिमेशन, भावपूर्ण कथानक आणि प्रभावी व्हॉइस अॅक्टिंग यामुळे ही मालिका लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्वांनाच भावते आहे. दिवाळीच्या सुट्टीत संपूर्ण कुटुंबासोबत पाहण्यासारखी आणि विचार करायला लावणारी ही मालिका बिंज-वॉच लिस्टमध्ये नक्कीच असायला हवी.
जर तुम्ही पौराणिक कथा, भारतीय संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचं सुंदर मिश्रण पाहू इच्छित असाल, तर ‘कुरुक्षेत्र’ तुमच्यासाठी योग्य निवड आहे.‘कुरुक्षेत्र’ या मालिकेचं खास वैशिष्ट्य म्हणजे तिने महाभारताच्या अठरा दिवसांच्या युद्धाची मांडणी १८ वेगवेगळ्या योद्ध्यांच्या दृष्टिकोनातून केली आहे. ही अनोखी सादरीकरण शैली प्रेक्षकांना अधिक गुंतवून ठेवते. प्रत्येक भागात एक वेगळा योद्धा केंद्रस्थानी असून, त्याच्या अनुभवातून युद्धाचे वेगवेगळे पैलू उलगडले जातात.नेटफ्लिक्सवर 10 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झालेली ‘कुरुक्षेत्र’ ही भारताची पहिली पौराणिक अॅनिमेटेड सिरीज सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. रिलीज होताच ही मालिका नंबर 1 ट्रेंडिंग सिरीज ठरली असून, प्रेक्षक आणि समीक्षक दोघांनीही तिला भरभरून दाद दिली आहे.