Avneet kaur remembers boy misbehaved with me on holi then she beat him with bat
टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून अभिनयात पदार्पण करणाऱ्या अवनीत कौरने आपल्या अभिनयाच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले. २३ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीने अनेक टेलिव्हिजन सीरियल्स आणि चित्रपटांमध्ये काम करत इंडस्ट्रीत स्वत:चे स्थान प्रस्थापित केले आहे. कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणारी अवनीत फॅशन आणि सौंदर्यामुळेही चर्चेत असते. बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या अवनीतने नुकतीच एक मुलाखत दिली. त्या मुलाखतीत तिने तिला आलेले वाईट अनुभव शेअर केले आहेत. एका मुलाने तिच्यासोबत गैरवर्तन केलं होतं, असं तिने मुलाखतीत सांगितलं.
“भारतीयांच्या टॅलेंटला दुर्लक्षित…” ऑस्कर पुरस्कारांबद्दल दीपिका पादुकोण जरा स्पष्टच बोलली…
अलीकडेच अवनीतने हॉटरफ्लायशी बोलताना तिच्या बालपणी होळीमध्ये तिच्याबरोबर घडलेली एक धक्कादायक घटना सांगितली. ती म्हणाली की, “लहानपणी होळीच्या दिवशी मी एका मुलाला सांगितलं होतं की, माझ्या अंगावर फुगा मारु नको. पण तरीही त्याने माझ्या नितंबांवर पाण्याने भरलेला फुगा फेकला होता. मग मी विचार केला आता याला सोडायचं नाही. मी त्याला रागात म्हटलं की, बेटा, आता तू बघच. मी कशी मुलगी आहे हे तुला माहीत नसेल. रागात बॅट हातात घेतली आणि मी त्या मुलाला पकडून मारलं.” अवनीतने पुढे सांगितलं की, त्या मुलाला बॅटने मारहाण केल्यानंतर त्या मुलाची आई माझ्या आईकडे मी त्याला मारल्याची तक्रार करण्यासाठी आली होती. माझी आई म्हणाली, “होय, कारण तुमच्या मुलाने मार खाण्यासारखंच काम केलं होतं.”
संतोष देशमुखांच्या मुलाला भेटून आमिर खान भावूक! कडकडून मारली मिठी; किरण म्हणाली, ‘हिंमत कायम..’
दरम्यान, २३ वर्षीय अवनीत आणि क्रिकेटपटू शुभमन गिल एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहेत. भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याच्या काही दिवसाआधी अवनीतने दुबईतील स्टेडियममधील काही फोटो पोस्ट केले होते. त्यामुळे तिच्या आणि शुभमनच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या होत्या. अवनीतने शुभमनच्या वाढदिवशी इन्स्टाग्रामवर एक पोस्टही शेअर केली होती. त्यानंतर तिने दुबईतील फोटो शेअर केले, त्यामुळे अवनीत व शुबमन एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जातंय. पण या दोघांनीही याबद्दल अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.
Jaat: साऊथमध्ये भारी पडणार ‘ढाई किलो का हाथ’, सनी देओलच्या ‘जाट’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित!