Punha Shivajiraje Bhosale Marathi Movie Poster
लवकरच मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक महेश मांजरेकर एक नवा सिनेमॅटिक प्रवास घेऊन येत आहेत , ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले!’. या चित्रपटाची अधिकृत घोषणा महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर करण्यात आली होती. “महाराष्ट्र फक्त महाराजांनाच ऐकतो, म्हणूनच पुन्हा शिवरायांची महाराष्ट्राला गरज आहे.”, असं सांगत महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचा सामाजिक आणि भावनिक गाभा स्पष्ट केला.
“फोन करून माझी बायको मला म्हणते…”, प्रसिद्ध अभिनेत्याची परदेशात असलेल्या पत्नीसाठी भावूक पोस्ट
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त, महेश मांजरेकर दिग्दर्शित बहुप्रतिक्षित ‘पुन्हा शिवाजी राजे भोसले’ या चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या सिद्धार्थ बोडकेचा पहिला लूक (फर्स्ट लूक) समोर आला आहे. राज्याभिषेक दिनाच्या पवित्र आणि ऐतिहासिक दिवशी हा लूक प्रदर्शित करून या चित्रपटाच्या टीमने एकप्रकारे शिवराज्याभिषेकाला आधुनिक अभिवादनच केले आहे.
सिद्धार्थ बोडके यांनी साकारलेला शिवाजी महाराजांचा राजस आणि तेजस्वी लूक पाहून चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. घोड्यावर विराजमान, डोक्यावर साजिरी मुगुट, डोळ्यांत विजेसारखी चमक आणि ताठ कणा दाखवणारी देहबोली या लूकमध्ये सिद्धार्थ अत्यंत आत्मविश्वासाने शिवरायांचा प्रभावी दरारा प्रेक्षकांसमोर उभा करत आहे.
‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अनुभवी महेश वामन मांजरेकर यांनी केले असून, चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी राहुल पुराणिक आणि राहुल सुगंध यांनी सांभाळली आहे. संवादलेखन सिद्धार्थ साळवी यांनी केले आहे.