अभिनेता रणवीर सिंहच्या न्यूड फोटोशूटची चर्चा जोरदार रंगू लागली आहे. काहींनी रणवीरचे फोटो पाहून टिका केली असून त्याला ट्रोलही केले जात आहे. रणवीरच्या न्यूड फोटोनंतर आता तमिळ अभिनेता विष्णू विशालही (Vishnu Vishal) या ट्रेंडमध्ये सामील झाला आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही न्यूड फोटो शेअर केले आहेत. मात्र, हे सेमी न्यूड फोटो आहेत. रणवीरचे न्यूड फोटोशूट (Nude photoshoot) अनेकांच्या पचणी पडलेले नसताना आता यामध्ये विशालनेही उडी मारल्याने आर्श्चय व्यक्त केले जात आहे.
विष्णू विशालने 5 फोटो सोशल मीडियावर केली शेअर
विष्णू विशालने 5 फोटो शेअर केले आहेत, ज्यात त्याने वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्याचे हे सर्व फोटो पत्नी आणि प्रसिद्ध बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा हिने क्लिक केली आहेत, याबद्दल विष्णू विशालने देखील कॅप्शनमध्ये सांगितले आहे. तामिळ चित्रपट अभिनेता विष्णू विशाल आता रणवीर सिंहच्या पावलावर पाऊल ठेवताना दिसत आहे. त्याने ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाऊंटवर त्याचे अनेक फोटो शेअर केले आहेत आणि कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, ‘तो देखील या ट्रेंडमध्ये सामील होत आहे.