Emraan Hashmi Ground Zero Teaser Released Sai Tamhankar Lalit Prabhakar
‘फुटपाथ’, ‘मर्डर’, ‘गँगस्टर’ सारख्या चित्रपटांतून प्रसिद्धी मिळालेला इमरान हाश्मी गेल्या अनेक दिवसांपासून फिल्म इंडस्ट्रीपासून दूर आहे. शेवटचा ‘टायगर ३’ आणि ‘ए वतन मेरे वतन’ चित्रपटात प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता त्यानंतर अभिनेता लवकरच एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एका चित्रपटात ‘ग्राऊंड झिरो’ चित्रपटाचा समावेश होतोय. २८ मार्चला म्हणजेच आज या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. चित्रपटाच्या टीझरने प्रेक्षकांचे लक्ष वेधलेय. अभिनेत्यासोबत या बहुचर्चित चित्रपटामध्ये बॉलिवूड अभिनेत्री नसून मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक असलेल्या अभिनेत्रीचा समावेश आहे.
विराट कोहलीचे अभिनयात पदार्पण? ‘या’ प्रोजेक्टमध्ये दिसणार क्रिकेटर; व्हायरल फोटोमागील सत्य काय?
सत्य घटनेवर आधारित असलेल्या ‘ग्राऊंड झिरो’ चित्रपटामध्ये इमरान हाश्मीसोबत मुख्य भूमिकेत मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर आहे. सईसोबत चित्रपटात ललित प्रभाकरही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान, सई आणि ललित साकारत असलेली भूमिका कोणती आहे, अद्याप हे तरी गुलदस्त्यात आहे. ‘ग्राऊंड झिरो’ चित्रपटाचा सध्या सोशल मीडियावर टीझर तुफान व्हायरल होत असून या व्हायरल टीझरवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेल्या कलाकारांनी टीझर आपआपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केली आहे. या शेअर केलेल्या टीझरमध्ये, इमरान लष्करी अधिकाऱ्याच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.
टीझरची सुरुवात अशांत वातावरणापासून सुरू होते. एका लष्करी अधिकाऱ्याची दिवसाढवळ्या आणि सार्वजनिक ठिकाणी गोळी घालून हत्या केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यानंतर रेकॉर्ड केलेल्या आवाजात दहशतवाद्याचा आवाज येतो, तो म्हणतो, “हिंदुस्तान के वजीर-ए-आलम सुन लें… कश्मीर की आझादी, एक ही मकसद। मोहम्मद इन्साफ करेगा।” त्यानंतर इमरान हाश्मी एका जीवघेण्या मिशनवर जाताना दिसत आहे आणि अखेर शेवटी एका बॉम्बस्फोटात तो जखमी होतो. तेव्हा इमरान एक डायलॉग म्हणतो, त्याच्या डायलॉगने सर्वांचेच मन जिंकले. “सिर्फ कश्मीर की जमीन हमारी है या यहां के लोग भी?” असं म्हणत इमरान काश्मीरमधील अशांत वातावरणाबद्दल प्रश्न उपस्थित करतो.
सलमान खानच्या वडिलांना ‘सिकंदर’ चित्रपट कसा वाटला ? सलीम खान यांनी डायलॉगबद्दल केले महत्वाचे विधान
गेल्या ५० वर्षांतील ‘बीएसएफ’चं सर्वांत मोठं मिशन ‘ग्राउंड झिरो’ चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. त्या मिशनमध्ये मुख्य नेतृत्व बीएसएफ डेप्युटी कमांडर नरेंद्र नाथ दुबे यांनी केले होते. त्यांचीच मुख्य भूमिका बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी साकारणार आहे. पहिल्यांदाच इमरान लष्करी अधिकाऱ्याच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच इमरानसह मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरही या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. पण अद्याप ती कोणत्या भूमिकेत दिसणार आहे, याची माहिती गुलदस्त्यात आहे. ‘ग्राउंड झिरो’ चित्रपटाचं दिग्दर्शन तेजस देओस्कर यांनी केले असून चित्रपटाच्या निर्मितीची धुरा कासिम जगमगिया, विशाल रामचंदानी, संदीप सी सिधवानी, अर्हाना बगाती, टॅलिसमॅन फिल्म्स, अभिषेक कुमार व निशिकांत रॉयने सांभाळली आहे.
‘ग्राउंड झिरो’ चित्रपट येत्या २५ एप्रिलला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत इमरान आणि सई यांच्याव्यतिरिक्त झोया हुसैन, मुकेश तिवारी, दीपक परमेश, ललित प्रभाकर, रॉकी रैना आणि राहुल वोहरा यांसारखे अनेक कलाकार मंडळी आहेत.