Delhi High Court Order Ar Rahman To Pay 2 Crore In A Copyright Dispute Of Ponniyin Selvan 2 Song Veera Raja Veera
ऑस्कर विजेता ए.आर. रहमान सध्या त्याच्या गाण्यामुळे चर्चेत आला आहे. ‘पोन्नियन सेल्वन २’ चित्रपटातील ‘वीरा राजा वीरा’ गाण्यामुळे संगीतकार ए.आर. रहमान आणि मद्रास टॉकीज नावाची प्रॉडक्शन कंपनी सुद्धा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाने गायकाला २ कोटी रुपयांचा दंड ठोठावला असून त्याच्यावर गाणे कॉपी केल्याचाही आरोप केला आहे. प्रसिद्ध शास्त्रीय गायक उस्ताद फैयाजुद्दीन वसिफुद्दीन डागर यांनी आरोप केला आहे की, रहमान यांच्या वडिलांनी आणि काकांनी १९७८ मध्ये सादर केलेल्या ‘शिव स्तुती’ या रचनेची नक्कल केली आहे.
विखुरलेले केस अन् विचित्र हास्य… ‘जारण’मधील अनिता दातेच्या लूकने सर्वांचेच वेधले लक्ष
मीडिया रिपोर्टनुसार, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित भारतीय शास्त्रीय गायक फैयाज वसिफुद्दीन डागर यांनी २०२३ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यामध्ये त्यांनी आरोप केला होता की ‘पोन्नियिन सेल्वन २’ चित्रपटातील ‘वीरा राजा वीरा’ हे गाणे त्यांचे वडील नासिर फय्याजुद्दीन डागर आणि काका झहीरुद्दीन डागर यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘शिवा स्तुती’ची प्रत आहे. त्यांनी ए.आर. रहमान आणि मद्रास टॉकीजसह इतर कंपन्यांना हे गाणे वापरण्यापासून बंदी घालण्याची मागणी केली होती. त्या गाण्याची पहिली रेकॉर्डिंग १९७८ मध्ये नेदरलँड्समधील रॉयल ट्रॉपिकल इन्स्टिट्यूटमध्ये झाली होती.
गायक ए.आर.रहमानने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. शिवाय, मद्रास टॉकीजच्या टीमनेही हे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. ‘पोन्नियिन सेल्वन २’ मधील ‘वीरा राजा वीरा’ हे गाणे १३ व्या शतकातील नारायण पंडित आचार्य यांच्या रचनेपासून प्रेरित आहे, असा त्यांचा युक्तिवाद आहे. ‘पोन्नियिन सेल्वन २’ हा चित्रपट २०२३ साली प्रदर्शित झाला. चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत, ऐश्वर्या व्यतिरिक्त चियान विक्रम, जयम रवी, त्रिशा कृष्णन, प्रभू, शोभिता धुलिपाला, ऐश्वर्या लक्ष्मी आणि प्रकाश राज यांच्याही भूमिका होत्या. चित्रपटात ऐश्वर्याने नंदिनी आणि मंदाकिनीची भूमिका साकारली होती.