(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)
इटलीमध्ये एका शर्यतीत दक्षिणेचा सुपरस्टार आणि रेसर अजित कुमारचा कार अपघात झाला. तो या अपघातातून सुखरूप बचावला आहे. हा अपघात GT4 युरोपियन सिरीज शर्यतीदरम्यान झाला. मालिकेच्या दुसऱ्या फेरीत मिसानो ट्रॅकवर झालेल्या अपघातातून तो थोडक्यात बचावला गेला आहे. तसेच अभिनेत्याने अपघातानंतर ट्रॅकवरून कचरा काढण्यात मदत केली. याबद्दल त्याचे खूप कौतुक केले जात आहे. चाहते त्याची वाहवाह करत आहेत.
अपघातानंतर अजितने ट्रॅकवरून कचरा काढला
GT4 युरोपियन सिरीजच्या अधिकृत X पेजने अपघातानंतर अजितच्या कारचा व्हिडिओ शेअर केला आहे. तो ट्रॅकवर उभ्या असलेल्या कारशी आदळला, परंतु त्याला दुखापत झाली नाही. व्हिडिओ पोस्ट करताना पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘नुकसान झाल्याने शर्यतीतून बाहेर पडला, पण तरीही अभिनेत्याने साफसफाई करण्यात मदत केली. याबद्दल आनंदी. अजित कुमार यांना पूर्ण आदर.’ व्हिडिओमध्ये अजित त्याच्या कारजवळ उभा राहून कचरा उचलताना दिसत आहे.
रॅपर Emiway Bantai ला स्टंट पडला महागात, शूटिंगदरम्यान कारमधून पडला अन्…
Out of the race with damage, but still happy to help with the clean-up. Full respect, Ajith Kumar 🫡 📺 https://t.co/kWgHvjxvb7#gt4europe I #gt4 pic.twitter.com/yi7JnuWbI6 — GT4 European Series (@gt4series) July 20, 2025
सोशल मीडियावर अभिनेत्याचं कौतुक
पोस्टवर कमेंट करताना एका युजरने म्हटले की, ‘अजित कुमारचा कार अपघात झाला आहे, आणि अभिनेता शर्यतीबाहेर झाला आहे. खरंतर या वर्षी आपण पहिल्यांदाच त्याला इतक्या मोठ्या नुकसानाला सामोरे जाताना पाहिले आहे.’ अजितने रेस ट्रॅकवरून कचरा काढण्यात देखील मदत केली. यावर एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘कारण तो एक चांगला अभिनेता आहे, तो जातो आणि साफसफाईत मदत करतो. बहुतेक ड्रायव्हर असे करत नाहीत.’ असे लिहून त्याने अभिनेत्याचे कौतुक केले आहे.
निर्मात्यांनी दाखवली ‘Kantara Chapter 1’ ची खास झलक, चित्रपटाशी संबंधित शेअर केली मोठी माहिती
अजित कुमार यांनी कारकीर्द
अजितने २००३ मध्ये फॉर्म्युला बीएमडब्ल्यू आशियासह रेसिंगमध्ये पहिल्यांदा पाऊल ठेवले आणि २०१० मध्ये फॉर्म्युला २ चॅम्पियनशिपमध्येही भाग घेतला. त्याने ब्रेक घेतला आणि यावर्षी २४ एच सिरीजसह पुनरागमन केले. अजित कुमार यावर्षी ‘गुड बॅड अग्ली’ या दक्षिण चित्रपटात दिसला. चित्रपटाने चांगली कमाई देखील झाली. आता अभिनेता लवकर नवनवे चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.