(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)
भारतीय हिप-हॉप जगतातील तेजस्वी स्टार एमीवे बंटाई सध्या त्याच्या ‘दुबई कंपनी’ या नवीन म्युझिक व्हिडिओच्या शूटिंगसाठी दुबईतील शारजाह येथे आहेत. पण अलीकडेच समोर आलेल्या एका व्हिडिओमुळे त्याचे चाहते चिंता व्यक्त करत आहेत. या व्हिडिओमध्ये एमीवे चालत्या कारमधून बाहेर पडताना दिसला आहे. त्यानंतर त्याला दुखापत झाली आहे. या व्हिडीओने आता सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
शूटिंग दरम्यान रॅपर एमीवे बंटाई जखमी
एमीवे बंटाईने त्याच्या यूट्यूब चॅनलवर या व्हीलॉगचा टीझर शेअर केला आहे, ज्यामध्ये तो स्टंट करताना पडला आहे. व्हिडिओमध्ये एमीवे टोयोटा एसयूव्हीच्या खिडकीतून खाली रस्त्यावर पडताना दिसत आहे. तसेच रॅपरचे शूटिंग देखील सुरु होते असे व्हिडीओमध्ये दिसत आहे. तसेच, हा अपघात जाणूनबुजून केलेला स्टंट होता की चूक हे स्पष्ट झालेले नाही.
सोनाक्षीच्या ‘निकिता रॉय’ला मिळाला कमी स्क्रीन टाइम, भाऊ कुश सिन्हाने ‘सैयारा’ चित्रपटाला दिला दोष
कॅप्शनमध्ये लिहिले स्टंट चुकला
इन्स्टाग्राम शेअर केलेल्या या व्हिडिओसह एमीवेने लिहिले आहे की, ‘स्टंट चुकला’. रॅपरच्या या पोस्टनंतर त्याचे चाहते चिंता व्यक्त करत आहे. त्याचे चाहते रॅपरच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत.
रॅपरच्या पोस्टवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया
एमीवेच्या पोस्टवर अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया देत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, ‘हा खूप कठीण प्रसंग होता भाऊ, देवाचे आभार, तू सुरक्षित आहेस.’ तर कोणीतरी म्हटले, ‘तू आमच्यासाठी खूप मेहनत करतोस, आता प्रेम दाखवण्याची आमची वेळ आली आहे.’ तसेच आता रॅपर ठीक असल्यामुळे चाहत्यांची चिंता मिटली आहे.
उर्फी जावेदचा लिप फिलर काढतानाचा व्हिडिओ व्हायरल; युजर्सला हसू अनावर, म्हणाले…
रॅपर एमीवे आहे तरी कोण ?
एमीवे बंटाई, याचे खरे नाव मोहम्मद बिलाल शेख आहे, त्याने २०१३ मध्ये ‘ग्लिंट लॉक’ या इंग्रजी रॅप गाण्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. पण त्यांच्या वडिलांच्या सल्ल्यानुसार त्याने हिंदीमध्ये रॅपिंग सुरू केले आणि २०१४ मध्ये आलेला ‘और बंटाई’ हा त्याचा पहिला हिट ट्रॅक ठरला. तेव्हापासून एमीवेने ‘मचेंगे’, ‘बंटाई’, ‘फिर से मचेंगे’ सारखे हिट गाणे दिले आहेत आणि भारतीय हिप-हॉपमधील सर्वात मोठ्या नावांपैकी एक बनला आहे.