(फोटो सौजन्य - अकाउंट)
अलिकडेच, गायक अभिजीत भट्टाचार्य यांनी संगीत दिग्दर्शक ए.आर. रहमान यांच्यावर थेट वाद्यांचा वापर करण्याऐवजी तंत्रज्ञानाचा वापर करून संगीत निर्मिती केल्याचा आरोप केला होता. त्यांच्यामुळे अनेक संगीतकार बेरोजगार असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावर आता एआर रहमान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आणि आता गायक अभिजीत भट्टाचार्य यांना ए.आर. रहमानने चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. तसेच त्याचे उत्तर ऐकून चाहते देखील थक्क झाले आहेत.
अरबाज खान दुसऱ्यांदा बनणार बाबा? पत्नी शूरासोबतच्या क्लिनिक बाहेरील Viral Video ने केले चकित!
अभिजीतने केले रेहमानवर गंभीर आरोप
अलिकडेच, एएनआयला दिलेल्या मुलाखतीत अभिजीतने रहमानवर सहकारी कलाकारांचा अनादर केल्याचा आरोप केला होता. अभिजीतने असाही आरोप केला होता की रहमान संगीत तयार करताना वाद्यांना कमी लेखतो. संगीत उद्योगात अलिकडच्या काळात झालेल्या बदलासाठी त्यांनी रहमानला जबाबदार धरले, जिथे सर्व काही लॅपटॉपवर केले जाते. त्यामुळे संगीत वाजवणारे कलाकार बेरोजगार राहतात.
रेहमानने अभिजीतचे आरोप फेटाळले
या आरोपांवर ए.आर. रहमान यांनी आपले मत व्यक्त केले आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. “मला प्रत्येक गोष्टीसाठी दोषी ठरवताय हे चांगला आहे, मला अजूनही अभिजीत आवडतो आणि मी त्याला केक पाठवेन. तसेच, हे त्याच मत आहे आणि तुमचे मत व्यक्त करण्यात काहीही गैर नाही.” असं ए.आर. रहमान म्हणाला आहे.
‘Jaat’ ने बॉक्स ऑफिसवर मिळवले वर्चस्व, अजित कुमारच्या ‘Good Bad Ugly’ने मोडला ‘पुष्पा’चा रेकॉर्ड!
१०० हून अधिक लोक काम करतात
रहमान म्हणाला, ‘मी नुकतेच दुबईमध्ये ६० महिलांसोबत एक ऑर्केस्ट्रा केला. त्यांना दरमहा काम दिले जाते आणि त्यांना विमा, आरोग्य आणि सर्वकाही दिले जाते. माझ्या प्रत्येक चित्रपटात, मग ते छावा असो किंवा पोन्नियिन सेल्वन, सुमारे २००-३०० संगीतकार सहभागी असतात आणि काही गाण्यांवर १०० हून अधिक लोक काम करतात. मी त्यांच्यासोबतचे फोटो पोस्ट करत नाही म्हणून कोणालाही त्याबद्दल माहिती नसते. ए आर रहमान यांनी सांगितले की, संगीतात सुसंवाद निर्माण करण्यासाठी संगणकांचा वापर केला जातो.