(फोटो सौजन्य - एक्स अकाउंट)
जान्हवी कपूरला कोणत्याही ओळखीची गरज नाही. २०१८ मध्ये ‘धडक’ या रोमँटिक ड्रामामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यापासून या तरुण अभिनेत्रीने स्वतःचे नाव कमावले आहे. ती तिची आई श्रीदेवीच्या विरोधात जाऊन चित्रपटसृष्टीत आली आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केले. जान्हवीने या सिनेमा सृष्टीत पदार्पण करून अनेक सुपरहोत चित्रपट दिले आहेत. आज अभिनेत्री स्वतःचा २७ वा वाढदिवस साजरा करत आहे. आणि आता याचनिमित्ताने आपण तिच्या सुपरहिट चित्रपटाबद्दल जाणून घेणार आहोत.
जान्हवी कपूरने चित्रपटांमध्ये प्रवेश करावा अशी श्रीदेवीची इच्छा नव्हती. पण तिला लहानपणापासूनच चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा होती. तिला चित्रपटसृष्टी खूप आवडायची, म्हणून तिचे वडील बोनी कपूर यांच्या मदतीने जान्हवीने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आणि चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. जान्हवी कपूरच्या सर्वोत्तम चित्रपटांवर टाकुयात एक नजर.
१. गुड लक जेरी – गुन्हेगारी आणि विनोदाचा एक मजेदार मिलाफ
या चित्रपटात जान्हवी कपूर एका साध्या मुलीची भूमिका साकारत आहे जी गुन्हेगारीच्या जगात अडकते. अभिनेत्रीचा अभिनय उत्कृष्ट आहे आणि डार्क कॉमेडीचा स्पर्श या चित्रपटाला खास बनवतो. तसेच तिचे पात्र देखील मजेदार असून चाहत्यांना ते आवडले आहे.
“तुझ्या पाठीवर तर फक्त फूल, खरं कमळ तर तुच…”; सोनम कपूरचे दिलखेचक फोटोशूट
२. मिली – सर्व्हायव्हल थ्रिलरमध्ये दमदार अभिनय
मिली हा एक थ्रिलर चित्रपट आहे ज्यामध्ये जान्हवी एका थंड फ्रीजरमध्ये अडकलेल्या मुलीची भूमिका साकारते. हा चित्रपट तिच्या अभिनय कौशल्याची साक्ष देतो आणि शेवटपर्यंत तुम्हाला खिळवून ठेवतो. या चित्रपटाची कथा खूपच थक्क करणार आहे. आणि त्यात जान्हवीने स्वतःचे पात्र उत्तमरित्या पार पाडले आहे. तिच्या अभिनयाचे कौतुक होत आहेत.
३. गुंजन सक्सेना- एका धाडसी महिलेची प्रेरणादायी कहाणी
हा चित्रपट भारतीय हवाई दलाच्या पहिल्या महिला पायलट गुंजन सक्सेनाच्या सत्यकथेवर आधारित आहे. जान्हवीने यामध्ये एक उत्तम अभिनय केला आहे, जो प्रेक्षकांना प्रेरणा देतो. अभिनेत्रीला या चित्रपटातील अभिनयासाठी प्रसंशा मिळाली आहे.
४. घोस्ट स्टोरीज २ – भयानकतेने भरलेली एक भयानक कथा
जर तुम्हाला हॉरर चित्रपट आवडत असतील तर ‘घोस्ट स्टोरीज २’ मधील जान्हवीचा अभिनय नक्की पहा. हा संकलनात्मक चित्रपट भीती आणि सस्पेन्सने भरलेला आहे. या चित्रपटाची कथा खूपच भयानक असून, अभिनेत्रीचा अभिनय पाहण्यासारखा आहे.
‘रात्र म्हणते… तू आहेस तर चंद्राची काय गरज?’ शिल्पा शेट्टीचा मनमोहक लुक
५. धडक – जान्हवी कपूरचा पहिला चित्रपट
जान्हवी कपूरने इशान खट्टरसोबत या रोमँटिक ड्रामामधून पदार्पण केले. चित्रपटाची कथा, गाणी आणि दोघांमधील केमिस्ट्री यामुळे तो हिट झाला. या दोघांचा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आणि याला चांगला प्रतिसाद देखील मिळाला. या चित्रपटातील सगळी गाणी आजही चाहत्यांना आवडत आहे. आणि या चित्रपटानंतर जान्हवीने अनेक हिंदी चित्रपटामध्ये काम करून सुपरहिट केले.
जान्हवी कपूरचा आगामी चित्रपट
जान्हवी कपूरचा आगामी चित्रपट सनी संस्कारीचा तुलसी कुमारी आहे. यामध्ये ती रोहित सराफसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. तसेच ती लवकरच सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘परम सुंदरी’ या आगामी चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे नुकतेच पोस्टर रिलीज झाले असून, हा चित्रपट 25 जुलै 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे.