(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘कुली’ हा चित्रपट ३०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. या आकडेवारीनुसार, हा चित्रपट अजूनही विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटापेक्षा खूप मागे आहे. रजनीकांतचा चित्रपट आणि विकी कौशलचा चित्रपट या वर्षीच्या टॉप बिग चित्रपटांच्या यादीत समाविष्ट झाला आहे. ‘कुली’ सोबत प्रदर्शित झालेला ‘वॉर २’ अजूनही या चित्रपटांपेक्षा खूप मागे आहे. त्याच वेळी, कुलीच्या कमाईत सातत्याने वाढ होत आहे. रजनीकांतचा हा चित्रपट विकीच्या चित्रपटापेक्षा किती मागे आहे? हे आपण आता जाणून घेणार आहोत.
जगभरात आणि भारतात चित्रपटाचे किती कलेक्शन?
सॅकनिल्कच्या अहवालानुसार, रजनीकांत यांच्या ‘कुली’ या चित्रपटाने जगभरात ३२० कोटी रुपये कलेक्शन केले आहेत. भारतीय कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटाने आतापर्यंत भारतात १९३.२५ कोटींचा व्यवसाय केला आहे. या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या दोन मोठ्या चित्रपटांपैकी ‘कुली’ आणि ‘वॉर २’ हा रजनीकांत यांचा ‘कुली’ हा चित्रपट टॉप भारतीय चित्रपटांच्या यादीत पोहोचला आहे.
‘कुली’ ‘छावा’ पेक्षा किती मागे आहे?
दुसरीकडे, या वर्षीचा भारतातील नंबर वन चित्रपट विकी कौशलचा ‘छावा’ आहे. वर्षाच्या पहिल्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने जगभरात ८०७.९१ कोटींचे कलेक्शन केले आहे. या आकडेवारीनुसार, हा या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. कुली अजूनही विकी कौशलच्या चित्रपटापासून ४८७.९१ कोटी दूर आहे. तसेच, बॉक्स ऑफिसवर कुली ज्या वेगाने कमाई करत आहे, त्यावरून असा अंदाज लावला जात आहे की हा चित्रपट टॉप चित्रपटांच्या यादीत आणखी वर पोहचू शकतो.
ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या निधनाने जुई गडकरी झाली भावुक, पोस्ट शेअर करत म्हणाली…
रजनीकांत ‘सैयारा’ लाही मागे टाकू शकला नाही
रजनीकांतचा ‘कुली’ अजूनही विकी कौशलच्या ‘छावा’ तसेच अहान पांडेच्या ‘सैयारा’ च्या मागे आहे. ‘सैयारा’ ने जगभरात ५४६.०९ कोटींची कमाई केली आहे. यानुसार, रजनीकांतचा चित्रपट अहान पांडेच्या चित्रपटापेक्षा २२६.९ कोटींनी मागे आहे. परंतु रजनीकांतच्या ‘कुली’ चित्रपटाचे कमाईचे आकडे आणखी वाढण्याची शक्यता आहे. आता ‘कुली’ चित्रपट किती कमाई करतो हे पाहणे मनोरंजनक ठरणार आहे.