(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
मराठी सिनेसृष्टीतील मनमिळावू आणि लोकप्रिय अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं वयाच्या ६९ व्या वर्षी निधन झाले आहे. शनिवारी दि. 16 ऑगस्ट त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने मराठी मनोरंजनसृष्टीत शोककळा पसरली आहे. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत ज्योती चांदेकर यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले आहे. तसेच अभिनेत्री शेवटच्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेत दिसल्या, या मालिकेद्वारे त्यांनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केले. याचदरम्यान या मालिकेतील अभिनेत्री जुई गडकरी ज्योती चांदेकर यांच्या निधनाने भावुक झाली आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून आपले दुःख व्यक्त केले आहे.
जुई गडकरीने ज्योती चांदेकर यांच्या निधनाने खूप दुःखी झाली आहे. तसेच तिने सोशल मीडियावर त्याच्या भावना मांडल्या आहेत. जुईने पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, तशी तिची आणि माझी पहिली भेट २०१० साली ‘बाजीराव मस्तानी’ या मालिकेच्या सेटवर झाली. आम्ही एकाच मेकपरुम मध्ये बसायचो.. तिची काम करण्याची पद्धत बघुन मी चकीत झाले होते.. या वयात ही कोण इतकं सुंदर कसं दिसु शकतं असा प्रश्न पडायचा. मग २०२२ साली ‘ठरलं तर मग’ या मालिकेचे काम करताना आम्ही पुन्हा भेटलो.’ असे जुईने लिहिले.
पुढे ती म्हणाली, ‘आधी आहो ज्योती ताई, मग अगं ज्योती ताई, मग पुर्णाआजी, मग फक्त आजी आणि नंतर “माझी म्हातारी” अशी आमची मैत्री वाढली होती म्हातारीला सगळ्याची आवड. माझ्या वयाच्या मुलींनाही लाजवेल अशी छान नट्टापट्टा करायची… छान साड्या, दागीने खास स्वतःचे नव नवीन कॅासमेटीक्स, जेल पॅालीश अशा सगळ्याची तीला खुप आवड. ‘
‘मला मुळात आजी आजोबा खुप आवडतात.. माझी आजी २०१५ साली गेली.. पण त्यानंतर मला माझ्या म्हातारीत माझी आजी पुन्हा भेटली… तशीच गोड गुबगुबीत.. तीच्या स्पर्षाची एक वेगळी ऊब होती आणि म्हणुन मी सतत तिच्या अंगा अंगाशी खेळायचे. तिच्या मांडीत बसायचे.. अंगावर झोपायचे… तिचे हात धरायचे.. तिला लाडाने माझी नखं लावायचे.. त्यावर ती प्रेमाने मला “आलं माझं मांजराचं पिल्लु” असं म्हणायची. ४-४.३० झाले कि तिचा खाऊचा डब्बा उघडायची… त्यात काय काय असेल ते सगळ्यांना द्यायची… बऱ्याचदा त्यात चिप्स, चकल्या, शेव असायचे.. त्यावरुन माझा रोज ओरडा खायची… गोड माझ्यापासुन लपवुन खायची आणि पकडलीच जायची.. कित्येकदा मी तिच्या तोडातुन भजी, गुलाबजाम बाहेर काढलेत.. पण म्हातारी ऐकायची नाहीच.’
‘हे’ काय म्हणाला अक्षर कोठारी! आदेश बांदेकर म्हणाले होते की,”डबक्याच्या बाहेर…”
‘पुण्यावरुन येताना आवर्जुन सगळ्यांसाठी क्रीमरोल आणायची. एकदा मी तिला जरा जास्तं ओरडले.. जेजे करायचं नाही तेच का करतेस असं खुप बोलले… त्यावर मला म्हणाली “मला पंडीतांकडे जायचंय”… आणि मी सुन्न पडले… त्यापुढे मी ना तिला ओरडु शकले ना काही बोलु शकले… आज तिला स्मशानात असं शांत झोपलेलं बघुन खुप त्रास झाला..एका क्षणात सगळं शांत झालं होतं… कधी कधी रक्ताची नसली तरी अशी नाती असतात जी खुप आनंदही देतात आणि त्रास ही… आजी तुझी उणीव कायम भासत राहील… तु परत येते सांगुन परत आलीच नाहीस… आतातरी पंडीताबरोबर शांत.. सुखी राहा,’ असे लिहून जुई गडकरीने भावुक पोस्ट शेअर केली आहे, आणि आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.