(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
घटस्फोटाच्या वेळी सहा महिन्यांच्या कूलिंग पीरियडमधून सूट मिळाल्यानंतर यासाठी क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्यांची पत्नी धनश्री वर्मा यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केली आहे. चहल आणि धनश्रीच्या घटस्फोटाच्या याचिकेवर २० मार्चपर्यंत निर्णय घेण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने कुटुंब न्यायालयाला दिले आहेत. तसेच आता हे दोघे आता लवकरच विभक्त होणार अजून, धनश्री वर्माला कोटींची पोटगी देखील देण्यात येणार आहे.
क्रिकेटपटू युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा बऱ्याच काळापासून चर्चेत आहेत. चहल आणि धनश्रीच्या घटस्फोटाच्या बातम्या बऱ्याच काळापासून येत होत्या पण त्यांनी मौन बाळगले होते. धनश्री आणि चहल वेगळे झाले आहेत आणि त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत. दरम्यान, युझवेंद्र धनश्रीला किती पोटगी देणार आहे याबद्दल मोठी बातमी समोर आली आहे.
बार अँड बेंचच्या अहवालानुसार, चहल धनश्रीला ४ कोटी ७५ लाख रुपये देणार असल्याचे समोर आले आहे. त्यापैकी त्याने आधीच २ कोटी ३७ लाख रुपये भरले आहे असे समजले आहे. अहवालानुसार, समझोत्याच्या अटींनुसार, चहलने धनश्रीला ४ कोटी ७५ लाख रुपयांची कायमस्वरूपी पोटगी देण्याचे मान्य केले होते, त्यापैकी २ कोटी ३७ लाख ५५ हजार रुपये आधीच देण्यात आले आहेत. उर्वरित रक्कम न देणे हे कुटुंब न्यायालयाने पालन न करणे मानले आहे.
धनश्रीने ६० कोटी रुपये मागितले होते का?
धनश्रीने पोटगी म्हणून ६० कोटी रुपये मागितल्याचे अनेक वृत्त समोर आले होते. तथापि, धनश्रीच्या कुटुंबाने हा दावा फेटाळून लावला होता. धनश्रीच्या कुटुंबातील एका सदस्याने एक निवेदन जारी करून पोटगीच्या बातम्या निराधार असल्याचे म्हटले होते. कुटुंबातील सदस्याने व्हायरल दाव्यांवर निराशा व्यक्त केली आणि सर्वांना निराधार माहिती पसरवू नये अशी विनंती केली. धनश्री वर्माने चहलकडून कधीही पोटगी मागितली नसल्याचे सदस्याने स्पष्ट केले आहे.
दोघांनी डिसेंबर २०२० मध्ये केले लग्न
चहल आणि धनश्रीचे डिसेंबर २०२० मध्ये लग्न झाले. मात्र, दोघेही गेल्या काही महिन्यांपासून वेगळे राहत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दोघांनीही यावर्षी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. यासोबतच त्यांनी सहा महिन्यांच्या अनिवार्य कूलिंग पीरियडला सूट देण्याची मागणीही केली होती. तथापि, त्याची याचिका कुटुंब न्यायालयाने फेटाळून लावली. तथापि, आता उच्च न्यायालयाने हा निर्णय उलटवला आहे, ज्यामुळे घटस्फोटाची प्रक्रिया लवकरच पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.