(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
यावेळी बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगने सर्वांना मागे टाकले आहे. त्याच्या “धुरंधर” चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एक खळबळ उडवून दिली आहे. बऱ्याच प्रतीक्षेनंतर, रणवीरचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे आणि त्याने आधीच एक खळबळ उडवून दिली आहे. “धुरंधर” पाहिलेले प्रत्येकजण त्याचे कौतुक करत आहे. याच बरोबर रणवीरपेक्षाही अक्षय खन्नाने प्रेक्षकांना वेडे केले आहे. त्याचा अभिनेय आणि आकर्षित भूमिकेने प्रेक्षकांना सिनेमागृहात वळायला भाग पडले आहे. आठवड्याच्या दिवशीही, “धुरंधर” चित्रपटाची कमाई थांबलेली नाही. चित्रपटाने फक्त चार दिवसांत सलमान खानच्या “सिकंदर” ला मागे टाकून नवा रेकॉर्ड स्वतःच्या नावावर नोंदवून घेतला आहे. चौथ्या दिवशी चित्रपटाचे कलेक्शन कीती झाले जाणून घेऊयात.
Dhurandhar Movie: २२ वर्षीय तरुणाने ७२ तास जागून ‘धुरंधर’चा टीझर केला तयार, यामी गौतमशी आहे खास नात
रणवीर सिंगसोबत, एका अभिनेत्याला सर्वाधिक कौतुक मिळत आहे आणि तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अक्षय खन्ना आहे. “धुरंधर” मध्ये रणवीर सिंग, अर्जुन रामपाल, संजय दत्त, अक्षय खन्ना आणि आर. माधवन यांच्या प्रमुख भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या आहेत. परंतु, अक्षयने चित्रपटात खलनायकाची भूमिका केली आहे आणि त्याच्या लूकने सर्वांना प्रभावित केले आहे. तसेच त्याचा अभिनय आणि भूमिकेने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. सिनेमागृहातून बाहेर पडताना प्रेक्षक त्याचे तोंडभरून कौतुक करत आहेत.
चौथ्या दिवशी चित्रपटाची ऐकून कमाई
“धुरंधर” च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, चित्रपटाने फक्त तीन दिवसांत १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. जर हा चित्रपट याच दराने कमाई करत राहिला तर तो वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक बनू शकतो. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, “धुरंधर” ने सोमवारी सुमारे ₹२३ कोटींची कमाई केली, ज्यामुळे त्याची एकूण कमाई ₹१२६ कोटींवर पोहोचली आहे. मंगळवारीही जर याच दराने चित्रपटाने कमाई केली तर तो फक्त पाच दिवसांत ₹१५० कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे.
सलमानच्या ‘सिकंदर’ चित्रपटाला टाकले मागे
रणवीर सिंगच्या “धुरंधर” ने फक्त चार दिवसांत सलमान खानच्या “सिकंदर” ला मागे टाकले आहे. बॉलीवूड हंगामाच्या अहवालानुसार, “सिकंदर” चे जगभराचे कलेक्शन ₹१०३.४५ कोटी आणि भारतात ₹१२२.१४ कोटींचा कलेक्शन झाले होते, जे “धुरंधर” ने फक्त चार दिवसांत ओलांडला आहे. आणि नवा रेकॉर्ड तयार केला आहे. आता धुरंधर इतर कोणत्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. आदित्य धर यांनी पहिल्या भागाच्या शेवटी खुलासा केला की ते चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित करणार आहेत. “धुरंधर” चा दुसरा भाग १९ मार्च २०२६ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. जो पाहण्यासाठी चाहते आता खूप उत्साहित आहेत.






