( फोटो सौजन्य -सोशल मिडिया)
अभिनेत्री ईशा मालवीय पुन्हा एकदा तिच्या डान्स व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. यावेळी तिने लोकप्रिय ‘गुलाबी साडी’ गाण्यावर केलेल्या नृत्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. तिचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनीही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. विशेष म्हणजे अभिनेता रितेश देशमुख यांनीही ईशाच्या डान्सचे कौतुक केले आहे.
‘बिग बॉस 17’ नंतर ईशा मालवीयच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. ती सोशल मीडियावर सातत्याने डान्स रील्स आणि फोटो शेअर करत असते. तिच्या नव्या व्हिडिओत ती गुलाबी साडीत आकर्षक अंदाजात नृत्य करताना दिसत असून, तिच्या स्टेप्स आणि हावभावांनी चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
चाहत्यांकडून भरभरून कौतुक
ईशाच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने, “किती अप्रतिम! तुम्ही साडीत खूप सुंदर दिसता,” अशी कमेंट केली. दुसऱ्याने, “तुमचा डान्स आणि एक्सप्रेशन्स कमाल आहेत,” असे म्हटले. अनेक चाहत्यांनी तिच्या पारंपरिक लूकचेही कौतुक केले.
रितेश देशमुख यांनीही या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्यानंतर हा व्हिडिओ आणखी चर्चेत आला. अवघ्या 20 तासांत या रीलला 5.5 लाखांहून अधिक लाइक्स आणि हजारो कमेंट्स मिळाल्या आहेत.
View this post on Instagram
अलीकडेच दुसऱ्या कारणामुळेही आली होती चर्चेत
काही दिवसांपूर्वी ईशा मालवीय एका पुरस्कार सोहळ्यात उपस्थित होती. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे दिसणारे विकास महंते यांना पाहून तिने क्षणभर त्यांनाच पंतप्रधान समजल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. नंतर हा व्यक्ती मोदींचे प्रतिरूप असल्याचे समोर आले.
सध्या मात्र ईशा मालवीय तिच्या ‘गुलाबी साडी’ डान्स व्हिडिओमुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रेंड करत असून, तिच्या चाहत्यांकडून तिच्या नृत्याचे भरभरून कौतुक होत आहे.






