(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
सुपरमॅन चित्रपटांमध्ये जनरल झोडची भूमिका साकारणारे टेरेंस स्टॅम्प यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हा अभिनेता सुपरमॅन चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारण्यासाठी ओळखला जात असे. तसेच त्यांच्या या चित्रपटामुळे त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. अभिनेत्याच्या कुटुंबीयांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे. आता या दुःखद बातमीमुळे हॉलिवूड इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या निधनाने जुई गडकरी झाली भावुक, पोस्ट शेअर करत म्हणाली…
अभिनेत्याच्या कुटुंबाने काय म्हटले?
टेरेंस स्टॅम्पच्या कुटुंबाने रॉयटर्सला दिलेल्या निवेदनात अभिनेत्याच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘टेरेंस स्टॅम्पने अभिनेता आणि लेखक म्हणून आपली छाप सोडली आहे. त्यांची प्रतिमा येणाऱ्या काळात लोकांना प्रेरणा देईल. या दुःखद काळात आम्ही तुम्हा सर्वांना गोपनीयतेची विनंती करत आहोत. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.’ असे लिहून अभिनेत्याच्या कुटुंबाने ही माहिती दिली आहे.
त्यांना ऑस्करसाठीही नामांकन मिळाले होते
१९६० च्या दशकात टेरेन्स हे इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्यांपैकी एक होते. इंडस्ट्रीतील त्यांचा प्रवास त्यांच्या वैयक्तिक आयुष्याइतकाच उत्तम होता. त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातच त्यांना ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. १९७८ मध्ये आलेल्या सुपरमॅन आणि १९८० मध्ये आलेल्या त्याच्या सिक्वेलमध्ये खलनायकाची भूमिका करून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांचे जनरल झोड हे पात्र आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे.
‘Chhaava’ पासून ‘Coolie’ किती आहे मागे? टॉप ३ मध्ये येऊनही चित्रपटाची एवढीच कमाई
लंडनच्या ईस्ट एंडमध्ये जन्मले टेरेंस स्टॅम्प
लंडनच्या ईस्ट एंडमध्ये जन्मलेल्या टेरेंसचे बालपण खूप कठीण होते. दुसऱ्या महायुद्धातील बॉम्बस्फोटातून हा अभिनेता थोडक्यात बचावला. त्यानंतर, त्यांनी शाळा सोडली आणि आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित केले आणि जाहिरातींमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. या अभिनेत्याने ‘सुपरमॅन’ तसेच १९६८ मध्ये ‘थिओरेम’, १९७१ मध्ये ‘अ सीझन इन हेल’ आणि कल्ट क्लासिक ‘द अॅडव्हेंचर्स ऑफ प्रिस्किला, क्वीन ऑफ द डेझर्ट’ सारख्या चित्रपटांमध्ये काम करून आपली ओळख निर्माण केली.