(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
सध्या स्वित्झर्लंडमध्ये लोकार्नो फिल्म फेस्टिव्हल २०२५ आयोजित केला जात आहे. या कार्यक्रमात चिनी सुपरस्टार जॅकी चॅन यांना ‘पार्डो अल्ला कॅरिरा अचिव्हमेंट अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले. हा सन्मान मिळाल्यानंतर, अभिनेत्यानेही प्रतिक्रिया दिली आणि त्याच्या सुरुवातीच्या कारकिर्दीबद्दल सांगितले. अभिनेता या पुरस्कार सोहळ्यात नक्की काय म्हणाला हे आपण आता जाणून घेणार आहोत.
जॅकी चॅनला मिळाला सन्मान
व्हरायटीच्या वृत्तानुसार, स्वित्झर्लंडमधील लोकार्नो फिल्म फेस्टिव्हल २०२५ मध्ये चिनी अभिनेता जॅकी चॅनला करिअर अचिव्हमेंट अवॉर्ड ‘पार्डो अल्ला कॅरिरा’ ने सन्मानित करण्यात आले. यासोबतच त्यांनी ब्रूस लीसोबतच्या एका चित्रपटातील एक प्रसंग शेअर केला आणि म्हटले की, ‘मी सुपरमॅन नाही. मला भीती वाटते. कोणताही स्टंट करण्यापूर्वी मला वाटते, ‘यावेळी मी मरेन का?’ असे अभिनेता म्हणाला.
जॅकी चॅनने त्याच्या सुरुवातीच्या कारकिर्दीबद्दलही सांगितले
अभियना जॅकी चॅनने त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीबद्दक देखील सांगितले आहे. व्हरायटीशी बोलताना अभिनेता विनोदाने म्हणाला, “मी आळशी, खोडकर होतो, मला अभ्यास करायचा नव्हता, म्हणून माझ्या वडिलांनी मला मार्शल आर्ट्स स्कूलमध्ये पाठवले. लहानपणापासूनच मला लढाईची आवड होती. नंतर त्यांना विचारले, ‘तुम्हाला शाळा आवडली का?’ अभिनेत्याने म्हटले, हो, मला शाळा खूप आवडायची. मी एखाद्याला ठोसा मारू शकतो, मला जे हवे ते करू शकतो.’ असे अभिनेता म्हणाला.
War 2: ज्युनियर एनटीआर आणि हृतिकशिवाय ‘हा’ अभिनेता दिसणार कॅमिओ भूमिकेत, ॲक्शनचा होणार धमाका
जॅकी चॅनने वडिलांबद्दल सांगितला किस्सा
अभिनेत्याने असेही कबूल केले की तो कधीही स्वतःला फक्त अभिनयापुरते मर्यादित ठेवू इच्छित नव्हता. जॅकी चॅन म्हणाला, ‘मी स्वतः सर्वकाही करतो. आता, मी चित्रपट निर्मात्यांना सांगतो, ‘जर तुम्ही फक्त दिग्दर्शन करायला शिकलात तर ते पुरेसे नाही.’ पुरस्कार स्वीकारताना, चॅनने त्याच्या वडिलांशी झालेल्या संभाषणाची आठवण केली, जेव्हा त्यांनी त्याला विचारले, ‘मी ६० वर्षांचा आहे. तू ६० वर्षांच्या वयातही लढू शकता का?’ चॅनने उत्तर दिले, ‘मला काय बोलावे हे माहित नव्हते. पण आता मी ७१ वर्षांचा आहे आणि मी अजूनही लढू शकतो.’ असे म्हणून अभिनेत्याने स्वतःचे मन व्यक्त केले.