(फोटो सौजन्य - अकाउंट)
‘ही-मॅन’ धर्मेंद्र यांच्या आरोग्यविषयक अपडेट्सदरम्यान, मार्शल आर्टिस्ट आणि अभिनेता जॅकी चॅन यांच्या निधनाच्या बातम्याही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.इन्स्टाग्रामवर आणि फेसबुकवरील अनेक पोस्टमध्ये अभिनेता आता जगात राहिलेला नाही असा दावा केलेला दिसत आहे. काही जण असा दावा करतात की त्यांच्या पत्नी आणि मुलीने याची पुष्टी केली आहे. परंतु, हे सर्व दावे खोटे आहेत. ७१ वर्षीय अभिनेता जिवंत आणि निरोगी आहेत. तसेच अभिनेत्याच्या येणाऱ्या बातम्या या सगळ्या फेक आहेत.
खरं तर, जॅकी चॅन यांच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि त्यांच्या जुन्या दुखापतीमुळे त्यांचे निधन झाले. व्हायरल पोस्टमध्ये लिहिले होते, “७१ वर्षीय जॅकी चॅन यांचे दशकांपूर्वी झालेल्या दुखापतीमुळे काही अडचणी आल्या ज्याच्या गुंतागुंतींशी झुंज देत आता अभिनेत्याच्या निधन झाले आहे. हॉलिवूड सेलिब्रिटींनी श्रद्धांजली वाहिली आहे आणि कुटुंबाने याची पुष्टी केली आहे.” असे लिहून ही फेक बातमी पसरवण्यात आली आहे.
Facebook’s latest fake news: Jackie Chan has passed. He hasn’t. pic.twitter.com/fxBdLGuRCf — Digital Gal 🌸 (@DigitalGal_X) November 10, 2025
लोकांनी जॅकी चॅनबद्दल शेअर केली पोस्ट
दुसऱ्याने असा दावा केला की त्याचा मृत्यू आरोग्याच्या समस्यांमुळे झाला आहे, लिहिले, “२०१६ मध्ये ऑस्कर जिंकणारा जॅकी चॅन, अनेक महिन्यांच्या उपचारानंतर मृत झाल्याची पुष्टी झाली आहे.” दुसऱ्याने असेही लिहिले, “जॅकी चॅन यांचे चार दिवसांपूर्वी निधन झाले आहे, आणि कोणीही काहीही सांगितले नाही?!” दुसऱ्याने लिहिले, “या सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करण्यापूर्वी लोकांना स्वतःचे संशोधन करण्याची आठवण करून द्यायची आहे. मला तुम्हाला वारंवार सांगावे लागत आहे की जॅकी चॅन मृत नाही.”
जॅकी चॅनच्या मृत्यूच्या अफवा यापूर्वीही समोर आल्या
अभिनेता जॅकी चॅन यांच्याबाबत हे पहिल्यांदाच घडत नाही आहे. २०१५ मध्येही जॅकी चॅनच्या मृत्यूच्या अफवा समोर आल्या होत्या. स्वतः अभिनेत्याने यावर प्रतिक्रिया देताना म्हटले, “जेव्हा मी फ्लाइटमधून उतरलो तेव्हा दोन बातम्यांनी मला धक्का बसला.” सर्वप्रथम, मी अजूनही जिवंत आहे आणि दुसरे म्हणजे, रेड पॉकेट्सबाबत माझ्या नावाचा वापर करून वेइबोवर सुरू असलेल्या घोटाळ्यावर विश्वास बसत नाही.’ आता अभिनेत्याच्या पुन्हा अशा निधनाच्या बातम्या समोर आल्या आहेत. ज्यामुळे चाहते देखील संतापले आहेत.






