(फोटो सौजन्य - अकाउंट)
६ एप्रिल २०२५ रोजी मुंबईत अभिनेता मनोज कुमार यांच्यासाठी प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी अनेक बॉलिवूड कलाकार या प्रार्थना सभेत सहभागी झाले होते. प्रार्थना सभेत जया बच्चन देखील दिसल्या. मनोज कुमारच्या प्रार्थना सभेतील जया बच्चनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्या एका महिलेवर रागावत असताना दिसत आहेत. यामुळे अभिनेत्रीला पुन्हा एकदा ट्रोल केले जात आहे. आता त्या या सभेमध्ये का रंगवल्या हे आपण जाणून घेणार आहोत.
जया बच्चन यांनी महिलेला फटकारले
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये जया बच्चन कोणाशी तरी बोलत आहेत. अचानक मागून एक महिला येते आणि जयाला काहीतरी बोलते, ज्यामुळे जया रागावते. ती बाई जयाला स्पर्शही करते, जया तिला दूर करते. या व्हिडिओमध्ये जयाचा चेहरा रागाने लाल झालेला दिसतो आहे. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच चाहते या व्हिडीओला भरभरून प्रतिसाद देत आहेत.
जया बच्चन यांच्या रागामागील खरे कारण काय होते?
जर तुम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिला तर, जया बच्चन यांना राग आला कारण ती अज्ञात महिला मनोज कुमार यांच्या प्रार्थना सभेत जया बच्चन यांना फोटो काढण्यास सांगत होती. तसेच, महिलेसोबत उभा असलेला एक पुरूष जया बच्चनचा व्हिडिओ बनवत होता. यावर जया बच्चन रागावल्या. एखाद्याच्या प्रार्थना सभेत अशा कृत्यामुळे जया बच्चन रागावलेल्या दिसल्या आहेत.
सोशल मीडिया वापरकर्त्यांनी केले ट्रोल
जया बच्चन यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. लोक या व्हिडीओला भरभरून प्रतिसाद देत आहे. तसेच, काही वापरकर्ते जया बच्चन यांना ट्रोल करताना दिसले आहेत. काही युजर्सनी म्हटले की जया बच्चन अनेकदा लोकांवर रागावतात, त्यांचे हे वर्तन नवीन नाही. काही युजर्स म्हणाले की, तुम्ही जया बच्चनला इतके महत्त्व का देत आहात?