(फोटो सौजन्य-Social Media)
चित्रपटसृष्टीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. वास्तविक, ‘माय नेम इज खान’ आणि ‘रागिनी एमएमएस 2’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसलेला अभिनेता परविन दाबास हे रस्ता अपघातात गंभीर जखमी झाले आहेत, त्यानंतर अभिनेत्याला वांद्रे येथील होली क्रॉस फॅमिली हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना आज सकाळी घडली आहे. आणि सध्या परविनची प्रकृती चिंताजनक असून अभिनेता सध्या आयसीयूमध्ये दाखल आहे. अपघाताच्या वेळी अभिनेता परविन दाबास स्वतः कार चालवत होता असे सांगण्यात येत आहे. मात्र हा अपघात कसा झाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
‘प्रो पंजा लीग’ने निवेदन जारी केले
अभिनेता परविन दाबास ‘प्रो पंजा लीग’ चे सह-संस्थापक आहेत. अभिनेत्याच्या अपघातानंतर ‘प्रो पंजा लीग’ने अधिकृत निवेदन जारी केले आहे. त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्हाला कळविण्यात अत्यंत दु:ख होत आहे की, प्रो पंजा लीगचे सहसंस्थापक परविन दाबास यांना शनिवारी सकाळी झालेल्या दुर्दैवी कार अपघातानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या वांद्रे येथील होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या कठीण काळात परविन आणि त्याच्या कुटुंबियांसोबत आम्ही सोबत उभे आहोत. असे त्यांनी म्हटले आहे.
फेब्रुवारी 2020 मध्ये, अभिनेत्याने किरेन रिजुजू आणि ऑलिम्पिक बॉक्सिंग स्टार विजेंदर सिंग यांच्यासोबत प्रो पंजा लीग स्पर्धा सुरू केली. प्रो पंजा लीगच्या 6 संघांसह पहिला पूर्ण हंगाम 28 जुलै ते 13 ऑगस्ट 2023 रोजी सुरू करण्यात आला. अभिनेता सुनील शेट्टी ऑगस्ट 2023 मध्ये प्रो पंजा लीगचा अल्पसंख्याक भागधारक म्हणून ऑनबोर्ड आला.
हे देखील वाचा- ‘सिंघम अगेन’मध्ये नाही दिसणार चुलबुल पांडे? चित्रपटातील सलमान खानच्या कॅमिओचे जाणून घ्या सत्य!
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘खोसला का घोसला’ या चित्रपटातील भूमिकेसाठी परविन दाबास हा अभिनेता ओळखला जातो. अलीकडेच तो ‘मेड इन हेवन’ या प्राइम व्हिडिओ मालिकेत दिसला होता. अभिनेत्याने अनेक हिंदी चित्रपटामध्ये काम केले आहे. आणि त्याच्या कामामुळे तो चाहत्यांच्या पसंतीस आला आहे.