(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी भारत दौऱ्यावर आहे. चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक आहेत. सामान्य लोकांमध्ये आणि अगदी सेलिब्रिटींमध्येही त्याच्याबद्दलची क्रेझ दिसून येत आहे. राजकारण्यांपासून ते बॉलीवूड स्टार्सपर्यंत सर्वजण त्याला भेटण्यासाठी गर्दी करत आहेत. तसेच त्याला पाहण्यासाठी चाहते तुटून पडत आहेत. तसेच या सगळ्याचे व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
कोलकाता येथे झालेल्या लिओनेल मेस्सीचा पहिला कार्यक्रम वादात सापडला होता. चाहत्यांना त्याची एक झलकही पाहता आली नाही. सुपरस्टार शाहरुख खान त्याचा लहान मुलगा अबरामसोबत मेस्सीला भेटण्यासाठी पोहोचला होता. परंतु, कोलकाता नंतर हा कार्यक्रम हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आला होता, जो खूप यशस्वी झाला. आणि त्याला पाहून चाहते खुश झाले.
अंकिता लोखंडे आणि विकी जैनच्या घरावर GST अधिकाऱ्यांचा छापा; मनी लाँड्रिंग प्रकरणी कपलवर कोटींचा दंड
या बॉलीवूड स्टार्सनी लिओनेल मेस्सीची घेतली भेट
लिओनेल मेस्सी रविवारी मुंबईत आला. मुंबईत अनेक प्रमुख सेलिब्रिटी देखील त्याला भेटताना दिसल्या. करीना कपूर खान तिच्या मुलांसह त्याला भेटण्यासाठी पोहोचली. तिने तिचे दोन्ही मुलं तैमूर आणि जेहसोबत फोटोही काढले. तसेच अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर देखील आनंद दिसून आला. याचदरम्यान टायगर श्रॉफ आणि अजय देवगण देखील या कार्यक्रमाचा भाग झाले होते. त्यांनी लिओनेल मेस्सीसोबत फोटो काढले आणि त्याच्यासोबत स्टेज शेअर केला. अभिनेत्री शिल्पा शेट्टी देखील तिच्या कुटुंबासह लिओनेल मेस्सीला भेटण्यासाठी पोहोचली. शाहिद कपूर देखील त्याच्या मुलांसह दिसला.
VIDEO | Kolkata: Football icon Lionel Messi to virtually unveil his 70-foot statue from Salt Lake stadium, with West Bengal Minister Sujit Bose and Bollywood actor Shah Rukh Khan present at the event.#LionelMessi #Kolkata #Football (Full VIDEO available on PTI Videos –… pic.twitter.com/dqISIwMgl4 — Press Trust of India (@PTI_News) December 13, 2025
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या पत्नीसह उपस्थित होते. त्यांनी अजय देवगण आणि टायगर श्रॉफचे शाल घालून स्वागत केले. या कार्यक्रमादरम्यान चाहते थोडे नाराज दिसत होते. चाहत्यांनी सोशल मीडियावर लिहिले की ते बॉलीवूड सेलिब्रिटींना नव्हे तर लिओनेल मेस्सीला भेटण्यासाठी आले होते.
लिओनेल मेस्सी आणि सचिन तेंडुलकरची भेट
मुंबईतील कार्यक्रमात लिओनेल मेस्सी क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरलाही भेटला. लिओनेल मेस्सी सचिन तेंडुलकरला भेटला आणि त्यांनी बराच वेळ संवाद साधला. हसत हसत दोघांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. या दरम्यान लिओनेल मेस्सी सचिन तेंडुलकरची जर्सी हातात धरून असल्याचे दिसून आले.






