(फोटो सौजन्य -इंस्टाग्राम)
बॉलिवूडच्या चमकदार जगात आणखी दोन स्टार किड्सनी मोठ्या पडद्यावर पाऊल ठेवले आहे. आमिर खानचा मुलगा जुनैद आणि बोनी कपूर-श्रीदेवी यांची धाकटी मुलगी खुशी कपूर यांचा ‘लवयापा’ हा चित्रपट ७ फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. आमिर खाननेही चित्रपटाच्या प्रमोशनसाठी खूप मेहनत घेतली. आमिरच्या मुलाला पाठिंबा देण्यासाठी शाहरुख खान आणि सलमान खान देखील विशेष स्क्रिनिंगला पोहोचले. ५० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाची खरी परीक्षा शुक्रवारपासून सुरू झाली आहे. आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने किती कमाई केली हे आपण आता जाणून घेणार आहोत.
‘लवयापा’चा ओपनिंग डे कलेक्शन
जुनैद खान आणि खुशी कपूर यांच्या ‘लवयापा’ या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात झाली आहे. चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, Sakcinlk कडून मिळालेल्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने आतापर्यंत १.१५ कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संत प्रतिसाद मिळाला आहे.
अद्वैत चंदनचा ‘लवयापा’ हा सर्वात कमी ओपनिंग करणारा चित्रपट ठरला.
‘लवयापा’ हा अद्वैत चंदन दिग्दर्शित तिसरा चित्रपट आहे. याआधी त्याने जुनैदचे वडील आमिर खानसोबत दोन चित्रपट केले आहेत. त्यांचा पहिला चित्रपट ‘सिक्रेट सुपरस्टार’ सुपरहिट ठरला आणि त्याने बॉक्स ऑफिसवरून ६३.४० कोटी रुपये कमावले. हा चित्रपट फक्त १५ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. दुसरा चित्रपट ‘लाल सिंग चड्ढा’ होता. या चित्रपटात आमिर खानने मुख्य भूमिका साकारली होती. १८० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने ६१.३६ कोटी रुपये कमावले. आणि आता त्याचा तिसरा चित्रपट ‘लवयापा’ने पहिल्याच दिवशी कमी कमाई केली आहे. अद्वैत चंदनचा हा चित्रपट सर्वात कमी ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे.
व्हॅलेंटाईन वीकमध्ये प्रदर्शित होणार मराठी पहिलंच रोमँटिक इंस्ट्रुमेंटल गाणं…
‘लवयापा’ स्टार कास्ट
‘लवयापा’च्या स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले तर, जुनैद खान आणि खुशी कपूर व्यतिरिक्त, चित्रपटात योगी बाबू, आशुतोष राणा, सत्यराज, किकू शारदा आणि ग्रुशा कपूर यांचा समावेश आहे. हा चित्रपट नुकताच व्हॅलेंटाइन वीक निमित्त सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. तसेच हा चित्रपट किती कमाई करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.