(फोटो सौजन्य - इंस्टाग्राम)
अर्जुन कपूर, भूमी पेडणेकर आणि रकुल प्रीत सिंग यांच्या आगामी रोमँटिक कॉमेडी चित्रपट ‘मेरे हसबंड की बीवी’ चा ट्रेलर रिलीज झाला आहे. आज शनिवारी, निर्मात्यांनी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आणि चाहत्यांना चित्रपटाच्या कथेची झलक दाखवण्यात आले. हा चित्रपट प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करताना दिसणार आहे. तसेच नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलमध्ये खूपच कॉमेडी आणि धमाल पाहायला मिळत आहे. तसेच हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. येत्या 21 फेब्रुवारीमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
हा प्रेम त्रिकोण नाही तर एक पूर्ण वर्तुळ आहे.
आज शनिवारी, निर्मात्यांनी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आणि चाहत्यांना चित्रपटाच्या कथेची झलक दाखवली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरनुसार, ‘प्रेम हा त्रिकोण नाही, तो एक वर्तुळ आहे.’ अर्जुन कपूर भूमी पेडणेकर आणि रकुल प्रीत सिंग यांच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकलेला दिसतया आहे. त्यानंतर हास्य आणि मौजमजेत गोंधळ आणि भांडणाचा काळ सुरू होतो. या चित्रपटात आदित्य सील आणि शक्ती कपूर यांच्याही मुख्य भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
चित्रपटाचा ट्रेलर
ट्रेलरमध्ये अर्जुन कपूर आणि भूमी पेडणेकर हे एक्स पती-पत्नी असल्याचे दिसून आले. भूमी तिची स्मृती गमावते आणि गेल्या पाच-सहा वर्षांचा अनुभव विसरून जाते आणि तिला अर्जुन कपूर तिचा प्रियकर वाटतो. दरम्यान, अर्जुन कपूर त्याची दुसरी प्रेयसी रकुल प्रीत सिंगसोबत रिलेशनशिपमध्ये आहे आणि त्याला भूमीच्या आजाराबद्दल कळते. या सगळ्याचा गोंधळ आणि मनोरंजन या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे.
चित्रपट कधी प्रदर्शित होईल?
‘मेरे हसबंड की बीवी’ हा चित्रपट २१ फेब्रुवारी २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट मुदस्सर अझीझ यांनी दिग्दर्शित केला आहे. जॅकी भगनानी आणि वाशु भगनानी त्यांच्या पूजा एंटरटेनमेंट बॅनरखाली याची निर्मिती करत आहेत. या चित्रपटाची घोषणा नोव्हेंबर २०२२ मध्ये झाली होती आणि आता तो २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे. वाशु भगनानी, जॅकी भगनानी आणि दीपिका देशमुख निर्मित हा एक विनोदी चित्रपट आहे. जो पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे. तसेच या चित्रपटाच्या पोस्टरने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.