(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
बॉलिवूड अभिनेत्री कृती सेननची बहीण नुपूर सेनन हिने ११ जानेवारी रोजी उदयपूर येथे गायक स्टेबिन बेनशी लग्न केले. या जोडप्याने प्रथम ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले आणि नंतर हिंदू पद्धतीने देखील त्यांचा विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्याला कुटुंब आणि जवळचे मित्र उपस्थित होते. या जोडप्याने काल सोशल मीडियावर त्यांच्या ख्रिश्चन लग्नाचे फोटो शेअर केले होते. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं होते.
११ जानेवारी रोजी नुपूर सेनन आणि स्टेबिन बेन यांनी दिवसा ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले. त्याच रात्री त्यांनी हिंदू रितीरिवाजांनुसार सात फेरे घेतले आणि आयुष्यभरासाठी एकमेकांचे झालं. लोक त्यांच्या लग्नाच्या फोटोंची आतुरतेने वाट पाहत होते. आता, या जोडप्याने त्यांच्या लग्नाचे खास फोटो शेअर केले आहेत.
दुसऱ्या फोटोमध्ये, स्टेबिन बेन त्यांची वधू नुपूर सेननचा हात धरून सात फेरे घेत आहे.त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी कमेंट सेक्शनमध्ये फोटोंवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. सर्वांनी या जोडप्याचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली आहे.
या लग्नाच्या फोटोंमध्ये नुपूर आणि स्टेबिनचे संपूर्ण कुटुंब त्यांना आशीर्वाद देत असल्याचे दिसून आले आहे. सर्वांच्या नजरा क्रिम रंगाच्या लेहेंग्यात सुंदर दिसत असलेल्या कृती सेननवर होत्या. नुपूर आणि स्टेबिनच्या पोस्टमुळे कृती आणि कबीर डेटिंग करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
नुपूर सेनन च्या लग्नात कृती सेनन आणि तिचा बॉयफ्रेंड यांची देखील चर्चा होताना दिसत आहे. लोक त्यांच्या लग्नाबद्दल या जोडप्याचे कौतुक करत आहेत. एका फोटोमध्ये, स्टेबिन नुपूरच्या केसांवर सिंदूर भरताना दिसत आहे, तर कृती त्याच्या मागे उभी असल्याचे दिसून येत आहे.






