(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान बलुचिस्तानवर केलेल्या अलीकडच्या वक्तव्यामुळे मोठ्या वादात अडकला आहे. त्याच्या या विधानानंतर संपूर्ण पाकिस्तानमध्ये तीव्र नाराजी आणि आक्रोश पसरला आहे.विविध अहवालांनुसार, पाकिस्तान सरकारने सलमान खान याचे नाव दहशतवादविरोधी कायदा (Anti-Terrorism Act, 1997) अंतर्गत असलेल्या ‘चौथ्या अनुसूची’मध्ये (Fourth Schedule) समाविष्ट केले आहे.
ही यादी अशा व्यक्तींसाठी राखीव असते, ज्यांच्यावर दहशतवादी संघटना किंवा कारवायांशी संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जातो. या यादीत असणाऱ्या व्यक्तींवर कडेकोड सरकारी देखरेख आणि हालचालींवर निर्बंध लागू होतात.या निर्णयानंतर पाकिस्तानमधील सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात सलमान खानविरुद्ध तीव्र चर्चा सुरू आहे.
I don’t know if it was slip of tongue, but this is amazing! Salman Khan separates “people of Balochistan” from “people of Pakistan” .
pic.twitter.com/dFNKOBKoEz — Smita Prakash (@smitaprakash) October 19, 2025
सलमान खानच्या रियाध फोरममधील वक्तव्यामुळे वाद
जॉय रियाध फोरमध्ये बोलताना सलमान खान म्हणाला होता,“जर तुम्ही एखादा हिंदी चित्रपट बनवला आणि तो इथे (सौदी अरब) प्रदर्शित केला, तर तो सुपरहिट ठरेल. तुम्ही तमिळ, तेलुगू किंवा मल्याळी चित्रपट बनवले आणि प्रदर्शित केले, तर तेही कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय करतील. कारण सौदी अरबमध्ये दुसऱ्या देशांतून आलेल्या लोकांची संख्या मोठी आहे. अनेकजण बलुचिस्तान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधून आले आहेत.” सलमान खानच्या या विधानामुळे पाकिस्तानमध्ये राजकीय आणि सामाजिक वाद निर्माण झाला आहे.ज्यामुळे मीडिया आणि सोशल मीडियावर चर्चेला वेग आला.
१६ ऑक्टोबर २०२५ रोजी सोशल मीडिया युजर नासिर अझीम यांनी शेअर केलेली एक अधिसूचना सध्या व्हायरल होत आहे. या अधिसूचनेत असा दावा केला जात आहे की, सलमान खान यांना “आझाद बलुचिस्तान फॅसिलिटेटर” म्हणून दहशतवादी यादीत समाविष्ट केले गेले आहे.असे असले तरी या अधिसूचनेला अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. शिवाय, कोणत्याही विश्वासार्ह पाकिस्तानी माध्यमांनी याबाबत वृत्त दिलेले नाही किंवा याला दुजोरा दिलेला नाही.






