Panchayat Season 4 When And Where To Watch Know Release Date
‘पंचायत’ ही एक मजेदार आणि भावनिक वेब सिरीज आहे जी उत्तर प्रदेशातील फुलेरा गावाची कहाणी सांगतो. त्यात, अभियांत्रिकी पदवीधर अभिषेक त्रिपाठी (जितेंद्र कुमार) गाव पंचायतीचा सचिव बनतो. मुंबईत झालेल्या वेव्हज समिट २०२५ मध्ये ‘पंचायत’चे नाव समाविष्ट करण्यात आले आहे. तसेच ‘पंचायत’ मालिका प्रेक्षकांना खूप आवडली तसेच या मालिकेला त्यांचे भरभरून प्रेम मिल्यानंतर या मालिकेचे निर्मात्यांनी अनेक भाग रिलीज केले. आणि आता या सिरीजने WAVES 2025 मध्ये स्वतःचे नाव सामील केले आहे. आणि एक अनोखा इतिहास रचला आहे.
‘Chhaava’ फेम अभिनेता Vineet Kumar लवकरच होणार बाबा; पत्नीसोबत करणार पहिल्या बाळाचे स्वागत!
‘पंचायत’ मालिका कशावर आधारित आहे?
न्यूज १८ च्या वृत्तानुसार, वेव्हजमध्ये पंचायत मालिका जोडण्यात आली आहे. ही मालिका ग्रामीण जीवन, राजकारण आणि नातेसंबंधांवर आधारित आहे. या मालिकेमध्ये खेडे गावातील मजेदार गोष्टी पाहायला मिळत आहेत. नीना गुप्ता (मंजू देवी), रघुबीर यादव (ब्रिज भूषण) आणि चंदन रॉय (विकास) सारखे कलाकार या मालिकेच्या अनेक सीझनमध्ये दिसले आहेत. आतापर्यंत त्याचे तीन सीझन प्रदर्शित झाले आहेत.
वेव्हज २०२५ म्हणजे काय?
वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट (वेव्हज) २०२५ १ ते ४ मे दरम्यान मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे आयोजित केले जाणार आहे. हा एक मोठा कार्यक्रम आहे जिथे चित्रपट निर्माते, अभिनेते आणि कथाकार एकत्र येऊन चित्रपट, वेब सिरीज आणि डिजिटल कंटेंटच्या भविष्यावर चर्चा करणार आहेत. त्यात अमिताभ बच्चन, शाहरुख खान, रजनीकांत, रणबीर कपूर, दीपिका पदुकोण सारखे स्टार देखील सहभागी होणार आहेत.
पंचायतीचे विशेष अधिवेशन
वेव्हज २०२५ च्या तिसऱ्या दिवशी ‘मेकिंग ऑफ पंचायत: ग्रासरूट्स स्टोरीटेलिंग’ या शीर्षकाचे सत्र असणार आहे. यामध्ये जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, रघुबीर यादव आणि फैसल मलिक हे पंचायतीची कहाणी आणि प्रादेशिक कथांचे महत्त्व याबद्दल संवाद साधताना दिसणार आहेत. या सत्रात डिजिटल मीडियामधील शोच्या योगदानाचा सन्मान केला जाणार आहे.