(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
“पंचायत” या मालिकेला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळाले आहे. या वेब सीरिजचे चार भाग प्रदर्शित झाल्यानंतर आता आणखी एक भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. मालिकेचा चौथा भाग प्रेक्षकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय होता. या मालिकेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे, जे “पंचायत सीझन ५” च्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. “पंचायत सीझन ५” २०२६ मध्ये प्रदर्शित होणार अशी अपेक्षा आहे.
‘पंचायत सीझन ५’ कधी प्रदर्शित होणार ?
द स्टेट्समनने शो स्टार सान्विका हिच्या म्हणण्यानुसार लिहिले की, “पंचायत सीझन ५ वर काम सुरू आहे. पटकथा लेखन आधीच सुरू झाले आहे.” तिने आधी सांगितले होते की, “आम्हाला या वर्षी किंवा पुढच्या वर्षी पंचायत सीझन ५ चे चित्रीकरण सुरू करण्याची आशा आहे. जर सर्व काही व्यवस्थित राहिले तर ते मे किंवा जून २०२६ मध्ये या नवा भाग प्रदर्शित करू शकतात.” परंतु, शोची अधिकृत रिलीज तारीख अद्याप जाहीर झालेली नाही आहे.
Hi 5 👋 Phulera wapas aane ki taiyyaari shuru kar lijiye 😌#PanchayatOnPrime, New Season, Coming Soon@TheViralFever @StephenPoppins #ChandanKumar @Akshatspyro @uncle_sherry @vijaykoshy @Farjigulzar #RaghubirYadav @Neenagupta001 @malikfeb @chandanroy77 @Sanvikka #DurgeshKumar… pic.twitter.com/59R6Xvj3R1 — prime video IN (@PrimeVideoIN) July 7, 2025
“पंचायत सीझन ५” चे संपूर्ण स्टारकास्ट
“पंचायत सीझन ५” मध्ये जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, रघुबीर यादव, फैसल मलिक, चंदन रॉय, सान्विका, दुर्गेश कुमार, सुनीता राजवार, अशोक पाठक आणि पंकज झा यांच्या भूमिका पाहायला मिळणार आहेत. “पंचायत सीझन ५” ची घोषणा जुलै २०२५ मध्ये करण्यात आली. अमेझॉन प्राइमने एक्स वर एका पोस्टमध्ये “पंचायत सीझन ५” चे पोस्टर रिलीज केले, ज्यामध्ये लिहिले होते, “हाय ५ ! फुलेराला परतण्यासाठी सज्ज व्हा. पंचायतचा नवीन सीझन लवकरच अमेझॉन प्राइमवर येत आहे.” हा नवा सीझन पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.
‘हिंदू धर्म स्वीकारा, काम मिळेल…’ अनुप जलोटा यांनी ए.आर. रहमानला दिला सल्ला; गायकाचा राग अनावर
नवीन सीझनची नवी कहाणी
मालिकेचा मागील सीझन क्रांती देवींच्या मंजू देवी (नीना गुप्ता) वर विजयाने संपला. ती फुलेराची नवीन प्रमुख बनली. आता, सर्वांचे लक्ष पंचायत सीझन ५ वर आहे. या सीझनची सुरुवात राजकीय गोंधळाने सुरु होणार आहे. फुलेरातील बदलत्या समीकरणांचा सचिवांवर परिणाम होईल का? आणि नव्या सीझनमध्ये नक्की काय काय घडेल? हे येणाऱ्या भागातच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.






