(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
‘पिछे देखो पिछे’ या मीमने जगभरातील लोकांचं मन जिंकणारा बाल कलाकार अहमद शाहने अलीकडेच त्याच्या चाहत्यांसाठी एक दुःखद बातमी शेअर केली आहे. अहमदने स्वतः इंस्टाग्रामवर त्याच्या भावाच्या मृत्यूची दुःखद बातमी शेअर केली आहे. दोन वर्षांपूर्वी त्याच्या धाकट्या बहिणीचे निधन झाले होते आता त्याने त्याचा धाकटा भाऊ उमेर शाहला सुद्धा कायमचं गमावलं आहे. त्याच्या भावाच्या अचानक निधनामुळे त्याचे संपूर्ण कुटुंब धक्का बसला आहे.
उमेर शाहच्या मृत्यूचे कारणही समोर आले आहे. अहमद शाहने केलेल्या पोस्टवर अनेकांनी त्याचे दुःख व्यक्त केले आणि कुटुंबासाठी मनापासून प्रार्थना केली. अदमदने त्याचा धाकटा भाऊ उमर गमावण्यापूर्वी त्याने त्याची धाकटी बहीण आयशालाही गमावले आहे. 2023 मध्ये अहमदच्या धाकट्या बहिणीचे निधन झाले.
ह्रुता आणि ललितच्या ‘आरपार’ ला प्रेक्षकांची पसंती, बॉलीवूड स्टार राजकुमार रावने देखील केले कौतुक
चित्रपट निर्माता साजिद नाडियाडवालाला मिळाली धमकी, मदतीसाठी पोलिसांकडे तक्रार दाखल
अहमद शाहच्या भावाच्या मृत्यूचे कारण काय ?
गम शोचे सूत्रसंचालक वसीम बदामी यांनी उमेर शाहच्या मृत्यूचे खरे कारण काय आहे हे उघड केले? ते म्हणाले, ‘आम्ही ज्या डॉक्टरांशी बोललो त्यांच्या मते, उमेरला उलट्या झाल्या होत्या ज्या चुकून त्याच्या फुफ्फुसात गेल्या, ज्यामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास झाला आणि नंतर त्याला हृदयविकाराचा झटका आला.
उमेर शाह कसा प्रसिद्ध झाला
अहमद शाहच्या व्हायरल “पीछे देखो पीछे” या व्हिडिओमुळे त्याला आणि कुटुंबाला सोशल मीडियावर प्रचंड प्रसिद्धी मिळाली लोकांना हा कंटेंट त्याच्या मजेदार आणि निष्पाप अंदाजामुळे आवडला. उमेर शाह अहमेदसोबत आणि अन्य माध्यमातून जीतो पाकिस्तान’ आणि ‘रमजान कार्यक्रम शान-ए-रमजान’ सारख्या लोकप्रिय कार्यक्रमात दिसला होता.