(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
काही काळापूर्वी बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार सुनील शेट्टी आणि परेश रावलसोबत दिसला होता. हे तिन्ही स्टार्स एकत्र येताच ‘हेरा फेरी 3’ या चित्रपटाबाबत अंदाज बांधण्यास सुरुवात झाली. या तिघांनी पुन्हा एकत्र काम करावे, असे लोक म्हणू लागले आहेत. दरम्यान, अक्षय कुमारच्या आणखी एका चित्रपटाच्या सिक्वेलची चर्चा जोरात सुरु झाली आहे. एकेकाळी अक्षय कुमारने या चित्रपटात प्रियांका चोप्रा सोबत काम केले होते. आणि हा चित्रपट सुपरहिट झाला होता. चाहत्यांनी या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद दिला होता.
हा चित्रपट म्हणजे, 2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या ऐतराज. मिळालेल्या माहितीनुसार, ऐतराज चित्रपटाचा सिक्वेल बनवण्यात येणार आहे. खुद्द सुभाष घई यांनीच या गोष्टीचा खुलासा केला आहे. या चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल बोलताना सुभाष घई म्हणाले, ‘OMG 2 लेखक आणि दिग्दर्शक अमित राय यांची कथा छान आहे. आता तो ऐतराज २ चा लेखक झाला आहे. आमचे फोनवर अनेकदा बोलणे झाले आहे. आम्ही अनेक स्टुडिओशीही बोललो आहोत. आता हा चित्रपट बनवण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत. मी एवढेच सांगेन की अमितची स्क्रिप्ट हिट आहे… मला चित्रपटाची कथा खूप आवडली.’ असे त्यांनी सांगितले.
हे देखील वाचा- ‘हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं’; बॉक्स ऑफिसवर पुन्हा कल्ला करायला परततोय ‘बाजीगर’!
सुभाष घई यांच्या या वक्तव्याने मनोरंजन वर्तुळात खळबळ उडाली आहे. ऐतराजच्या सीक्वलची लोक आतापासूनच वाट पाहू लागले आहेत. अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्राची जोडी ऐतराजच्या सिक्वेलमध्ये दिसणार की नाही हे सुभाष घई यांनी उघड केले नसले तरी, अक्षय कुमारने ऐतराज या चित्रपटात करीना कपूर आणि प्रियांका चोप्रा यांच्यासोबत रोमान्स करून खळबळ उडवून दिली होती. या चित्रपटात प्रियांका चोप्राने नकारात्मक भूमिका साकारली होती. अलीकडेच प्रियांका चोप्राने खुलासा केला होता की, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ती अनेकदा घरातही तिच्या पात्राप्रमाणे राहत असते. आता चाहत्यांच्या मनात या चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
हे देखील वाचा- Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या घरात या दोन सुंदरींचे खेळावर नाही तर मुलांच्या फिटनेसवर लक्ष, कधी म्हणे स्नॅक्स तर कधी….
अक्षय कुमारचे आगामी चित्रपट
स्काय फोर्स व्यतिरिक्त अक्षय कुमारकडे अनेक मोठे चित्रपट आहेत. ज्यामध्ये ‘शंकारा’, ‘जॉली एलएलबी 3’, ‘हाऊसफुल’चा पाचवा भाग, ‘वेलकम टू द जंगल’, ‘भूत बांगला’, ‘हेरा फेरी 3’ आणि ‘कनप्पा’ यांसारख्या चित्रपटाचा समावेश आहे. तसेच हे कसगळे चित्रपट लवकरच सिनेमागृहात झळकणार आहेत, ज्याची चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.