(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
या वर्षीचा फादर्स डे काही सेलिब्रिटींसाठी खूप खास असणार आहे. अलिकडेच अनेक सेलिब्रिटी पहिल्यांदाच वडील झाले आहेत आणि या वर्षी त्यांचा पहिलाच फादर्स डे आहे. हा फादर्स डे ते जोरदार साजरा करणार आहेत. अशा परिस्थितीत, त्यांच्यासाठी हा आनंद द्विगुणीत होणार आहे. या यादीत मनोरंजन क्षेत्रातील मोठ्या नावांचा समावेश आहे. चला जाणून घेऊयात हे कलाकार कोण आहेत जे वडील झाल्यानंतर पहिल्यांदाच हा खास दिवस साजरा करणार आहे.
केएल राहुल
भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी हे देखील नुकतेच आई- बाबा झाले आहेत. मुलगी इवराच्या जन्मानंतर शेट्टी कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज केएल राहुल आपल्या मुलीसोबत वडील म्हणून पहिला फादर्स डे साजरा करणार आहे. या सेलिब्रेशनचे फोटो पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
स्वप्नीलचा Father’s Day ठरला खास! लेकीसोबत सुंदर फोटो शेअर करत म्हणाला, ‘वडिलांसाठी…’
मिलिंद गाबा
प्रसिद्ध पंजाबी गायक मिलिंद गाबा आणि प्रिया बेनीवाल यांनी ३० मे रोजी घोषणा केली की त्यांनी देखील एका गोंडस बाळाचे स्वागत केले आहे. गायक मिलिंद गाबा यांना जुळ्या मुलांचा आशीर्वाद मिळाला आहे. गायक आता दोन्ही मुलांसोबत त्यांचा पहिला फादर्स डे साजरा करणार आहे. आतापर्यंत मिलिंद गाबा यांनी त्यांच्या मुलांचे फोटो शेअर केलेले नाहीत.
रणवीर सिंग
रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणची लाडकी मुलगी दुआचा जन्म ८ सप्टेंबर २०२४ रोजी झाला. हे जोडपे त्यांच्या मुलीसोबत अनेक वेळा दिसले आहे, परंतु त्यांच्या राजकुमारीचा चेहरा अद्याप जगासमोर आलेला नाही. वडील झाल्यानंतर रणवीरने अनेक वेळा मीडियासमोर आपल्या मुलीचा उल्लेख केला आहे आणि यांनतर त्याचे आयुष्य किती बदलले हे देखील अभिनेत्याने सांगितले आहे. अशा परिस्थितीत, रणवीर सिंग या वर्षी पहिल्यांदाच दुआसोबत फादर्स डे साजरा करताना दिसणार आहे.
अली फजल
या यादीत अली फजलचाही समावेश आहे. १६ जुलै २०२४ रोजी रिचा चढ्ढा आई झाली. या जोडप्याची मुलगी जुनेरा इदा फजल आता एक वर्षाची होणार आहे. जुनेरा इदा फजलचा जन्म गेल्या वर्षी फादर्स डेच्या दुसऱ्या महिन्यात झाला होता. अशा परिस्थितीत, या वर्षी जुनेरा इदा फजल वडील अली फजलसोबत एकत्र पहिला फादर्स डे साजरा करणार आहे.
परमब्रत चॅटर्जी
विद्या बालनच्या ‘कहानी’ चित्रपटातून प्रसिद्ध झालेले अभिनेते परमब्रत चॅटर्जी देखील अलीकडेच वडील झाले आहेत. परमब्रत चट्टोपाध्याय आणि त्यांची पत्नी पिया चक्रवर्ती यांनी २ जून रोजी सोशल मीडियावर घोषणा केली की ते पहिल्यांदाच आई वडील झाले आहेत. या जोडप्यानी त्यांच्या आयुष्यात एका गोड मुलाचे स्वागत केले आहे. परमब्रत चॅटर्जी पहिल्यांदाच वडील होण्याचा आनंद साजरा करणार आहे.