फोटो सौजन्य - जिओ सिनेमा सोशल मीडिया
बिग बॉस 18 विकेंडचा वॉर : बिग बॉस १८ चा नुकताच फॅमिली वीक पार पडला आणि यामध्ये सदस्यांच्या घरातील कुटुंबीय त्यांना भेटण्यासाठी बिग बॉसच्या घरामध्ये आले होते. या फॅमिली वीकमध्ये सर्वात आधी अभिनेत्री चाहत पांडेची आई घरामध्ये आली होती. यावेळी तिने येताच अविनाश मिश्रावर निशाणा साधला आणि त्याला बरेच काही सुनावले होते. त्याचबरोबर कशिश कपूरच्या आईने सुद्धा अविनाशची क्लास घेतली. चाहत पांडेच्या आईने अविनाशला ‘लडकीबाझ’ असेही म्हंटले होते. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्यावर मोठा वाद पाहायला मिळाला होता. आज विकेंडचा वार होणार आहे, ज्यामध्ये सलमान खान घरातल्या सदस्यांची शाळा घेताना दिसणार आहे.
या आठवड्यामध्ये फॅमिली विकमध्ये विवियन डिसेनाची पत्नी नुरन घरामध्ये आली होती यावेळी तिने अविनाश मिश्रावर अनेक आरोप केले होते. त्याचबरोबर ती म्हणाली होती की विवियन डिसेनाचा खेळ खराब करण्यास तू जबाबदार आहेस, म्हणून त्याला दोषी ठरवले होते यावरून विवियन डिसेनाची आत्ता सलमान खान आणि कामिया पंजाबी शाळा घेताना दिसणार आहेत. त्याचबरोबर ज्याप्रमाणे चाहत पांडेच्या आईने नॅशनल टेलिव्हिजनवर अविनाश मिश्राची शाळा घेतली आणि त्याला नको ते बोलले त्यामुळे आता सलमान खान चाहत पांडेची शाळा घेताना दिसणार आहे. सोशल मीडियावर एक नवा प्रोमो आला आहे यामध्ये सलमान खान चाहत पांडेची शाळा घेताना दिसत आहे.
प्रदर्शित करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये सलमान खान चाहत पांडेला म्हणतो की, तुझ्या आईने सांगितले होते की, तुला अशी मुलं आवडत नाहीत जी मुलीच्या मागेपुढे फिरत असतात. तुझ्या आईने तुझ्या चारित्र्यचे सर्टिफिकेट देऊन टाकले आहे. त्यानंतर आता आमच्या टीमला काही लोकांनी फोन केला आहे आणि आम्ही तुला काही तरी दाखवू इच्छित आहोत. त्यानंतर सलमान खान चाहत पांडेचा एक फोटो दाखवतो आणि यामध्ये केक आहे या केकवर ५ वर्ष अनिव्हर्सरी असे लिहिले आहे, त्यासोबत एक ऑडिओ देखील ऐकवण्यात आली आहे.
Chaahat ki maa ne diya tha unke liye ek clarification. Kya honge unke reactions jab Salman batayenge inki personal life se related kuch huge revelations? 😳
Dekhiye #BiggBoss18 Weekend Ka Vaar Shanivaar aur Ravivaar raat 9.30 baje @ColorsTV aur #JioCinema par. pic.twitter.com/8nLANQgx8g
— JioCinema (@JioCinema) January 4, 2025
त्यानंतर अविनाश मिश्रा म्हणतो की, त्यांनी स्वीकारले आहे आणि सर्वाना सेटवर माहिती आहे. यावर चाहत म्हणते की, अविनाश असे करू नकोस. यावर सलमान म्हणतो की, आहे तर आहे नाही आहे तर नाही आहे.