(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
हेरा फेरी ३ या चित्रपटाबद्दल प्रियदर्शन यांनी मौन सोडले आहे. प्रियदर्शन हेरा फेरी ३ चं दिग्दर्शन करण्यासाठी तयार आहेत. या चित्रपटात अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी हे तिघे ही म्हणजे चित्रपटातील राजू, बाबुराव आणि श्याम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
‘हेरा फेरी 3’ च्या संदर्भात प्रियदर्शन यांनी मौन सोडलं असून, त्यांनी स्पष्ट केलं की या चित्रपटाला पहिल्या भागाशी पूर्णपणे न्याय देणं आवश्यक आहे. त्यांनी सांगितले, “हा चित्रपट असा काही असायला पाहिजे की, त्याचं पहिल्या भागाशी योग्य संतुलन आणि कनेक्शन राहील. मला अजून सांगता येणार नाही की हे कसं होईल, पण हे अत्यंत महत्त्वाचं आहे की त्याला पहिल्या भागाच्या दर्जाची गरज असावी.”
दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्यानंतर बिग बींनी मोहनलाल यांचं केलं अभिनंदन! म्हणाले, “मी नेहमीच तुमचा चाहता”
खूप दिवसांपासून हेरा फेरी ३ ची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात पुन्हा एकदा अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टीची राजू, बाबुराव आणि श्याम ही प्रसिद्ध त्रिकूट पुन्हा एकत्र येईल.मात्र हा प्रकल्प अनेक वादांमुळे चर्चेत आहे.
‘बॅड्स ऑफ बॉलिवूड’वर क्रांती रेडकरने साधला निशाणा, कारण सिरिजमध्ये समीर वानखेडेचं…
काही काळापूर्वी परेश रावल यांच्या अचानक बाहेर पडण्याने चाहते आणि अक्षय दोघांनाही आश्चर्यचकित केले होते,पण आता, परेश यांनी त्यांचा निर्णय बदला असून ते पुन्हा चित्रपटात दिसणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चच्या आसपास ‘हेरा फेरी 3’ चे शूटिंग सुरू होईल. त्यामुळे प्रेक्षकांना खात्री आहे की हे तिघे एकत्र हेरा फेरी ३ मध्ये पाहायला मिळतील.
हेरा फेरी फ्रँचायझीचा इतिहास रंजक आहे. रामजी राव स्पीकिंग या मल्याळम चित्रपटापासून प्रेरित हा पहिला चित्रपट प्रचंड हिट झाला आणि भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या विनोदी चित्रपटांपैकी एक बनला. त्याचा सिक्वेल, फिर हेरा फेरी हा दिग्दर्शित दिवंगत नीरज व्होरा यांनी केला होता.