(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या चित्रपटावर तसेच मुलांच्या कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करत आहे. त्याचा मुलगा आर्यन लवकरच दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे, तर त्याची मुलगी सुहाना खान देखील त्याच्या आगामी ‘किंग’ चित्रपटातून चित्रपटगृहात पदार्पण करणार आहे. दरम्यान, कोट्यवधी रुपयांच्या या करारामुळे सुहाना खानच्या अडचणी वाढत असल्याचे दिसून येत आहे. अलीकडेच शाहरुखच्या लेकीने अलिबागमध्ये जमीन खरेदी केली होती. आता बातमी येत आहे की सुहाना खानने कोट्यवधी रुपयांच्या या करारासाठी परवानगी घेतली नाही.
खरंतर सुहानाने अलिबागच्या थळ गावात जमीन खरेदी केली होती. ही जमीन सुमारे १२.९१ कोटींना खरेदी केल्याची चर्चा होत आहे. आता त्याच गावातून माहिती समोर आली आहे की सरकारने शेतकऱ्यांना शेतीसाठी दिलेली जमीन सुहाना खानने परवानगीशिवाय खरेदी केली आहे. म्हणजेच तिने अलिबागमध्ये परवानगीशिवाय जमीन खरेदी केली आहे. आणि त्यामुळे अभिनेत्री आता चांगलीच अडचणीत अडकली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही जमीन 1968 मध्ये तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी नारायण विश्वनाथ खोटे यांना झाडे लागवडीसाठी भाडेपट्ट्याने दिली होती. या जमिनीवर कोणतेही बांधकाम करण्यास मनाई होती. नारायण खोटे यांच्या निधनानंतर जमीन त्यांच्या वारसदारांकडे गेली. त्यांच्याकडून सुहाना खानने विक्रीसाठी करार नोंदवला.
सुहानाच्या अडचणी का वाढत आहेत?
सुहाना खानचा हा व्यवहार बराच चर्चेत होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुहाना खानने तीन बहिणींकडून जमीन खरेदी केली होती. ज्यांची नावे आहेत- अंजली, रेखा आणि प्रिया. असे म्हटले जात होते की तिला तिच्या पालकांकडून जमीन वारसाहक्काने मिळाली होती. त्याच वेळी, तिने जमीन खरेदी करताना ७७.४६ लाखांची स्टॅम्प ड्युटी देखील भरली होती. परंतु नवीन माहिती समोर आली आहे की सरकारने ती जमीन शेतकऱ्यांना शेतीसाठी दिली होती. आणि सुहानाने परवानगीशिवाय तो व्यवहार केला आहे. इतकेच नाही तर आता या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. अलिबाग तहसीलदारांकडून निष्पक्ष अहवाल मागवण्यात आला आहे.
Bigg Boss 19 : पहिल्या आठवड्यातील टॉप स्पर्धक कोणते? टॉप रँकिंगमध्ये ही 6 नावे आली समोर
निवासी उपजिल्हाधिकारी संदेश यांनी या प्रकरणात आदेश दिले आहेत. तसेच, सुहाना खानने केलेल्या कोट्यवधींच्या व्यवहाराचा अहवाल लवकरच समोर येणार आहे. प्रत्यक्षात, जमीन खरेदी करताना केलेल्या नोंदणीकृत कागदपत्रांमध्ये सुहाना खानला शेतकरी म्हणून दाखवण्यात आले होते. त्याच वेळी, ज्या नावावर ही मालमत्ता नोंदणीकृत आहे ते आहे देजा वू फार्म प्रायव्हेट लिमिटेड. या कंपनीचे संचालक दुसरे तिसरे कोणी नसून गौरी खानची आई आणि वहिनी आहेत. तसेच, ही तिची अलिबागमधील पहिली मालमत्ता होती. त्यानंतर तिने आणखी एक गुंतवणूक केली. अभिनेत्रीने एका वर्षाच्या आत दुसऱ्यांदा अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावर १० कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केली.