(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता आणि ‘किंग खान’ म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खान यानं आपल्या करिअरमध्ये अनेक उत्तम आणि ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि हे चित्रपट बॉक्स ऑफिसवरही सुपरहिट ठरले आहेत. शाहरुख खानने 1992 मध्ये ‘दीवाना’ या चित्रपटाने बॉलीवूडमध्ये डेब्यू केला. डेब्यू करण्याआधी शाहरुख खानने काही टीव्ही सिरीयल्समध्येही काम केले होते.
शाहरुख खानला खर्या अर्थाने सुपरस्टार बनवणारा चित्रपट कोणता होता? आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशा एका चित्रपटाबद्दल, ज्यामुळे शाहरुख खानला प्रेक्षकांच्या मनात सुपरस्टार म्हणून स्थान मिळाले.
शाहरूख खानचा ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ चित्रपट 1995 मध्ये रिलीज झाला होता.या चित्रपटाने सिनेमागृहात इतिहास रचला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य चोप्राने केले आहे. ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ भारतीय सिनेमाच्या सर्वात रोमॅंटिक चित्रपटांमध्ये मानली जाते. या चित्रपटात शाहरुख खानने ‘राज’ ही भूमिका साकारली होती. राज आणि सिमरनच्या भूमिकेत शाहरुख आणि काजोलची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती.
Stranger Things चा सीझन ५ लवकरच थिएटर्समध्ये होणार दाखल, ‘या’ दिवशी चित्रपट होणार रिलीज
हा चित्रपटरिलीज झाल्यापासून 30 वर्षे उलटली तरी आजही प्रेक्षकांना तो खूप आवडतो. या चित्रपटामुळे शाहरुख खान बॉक्स ऑफिसचा ‘किंग’ बनला. किंग खानची ही फिल्म फक्त 4 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनली होती, तर त्या काळी या चित्रपटाने जगभरात 102.50 कोटी रुपयांची रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती. या जबरदस्त कमाईसह ही फिल्म ‘ऑल टाइम ब्लॉकबस्टर’ ठरली.
बॉलीवूडचा ‘किंग खान’ शाहरुख खान 2025-26 मध्ये काही मोठ्या प्रकल्पांसह परत येत आहे. त्यांच्या आगामी चित्रपटांमध्ये मुख्य आकर्षण ‘King’ आहे, ज्याचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करणार आहेत. या चित्रपटात शाहरुख आणि त्याची मुलगी सुहाना खान देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत असेल.रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि मारफ्लिक्स पिक्चर्सच्या बॅनरखाली निर्माण होणाऱ्या या चित्रपटाची शूटिंग जून 2025 पासून सुरू झाली असून रिलीज 2027 मध्ये अपेक्षित आहे.






