(फोटो सौजन्य - एक्स अकाउंट)
‘भाभी जी घर पर हैं’ फेम अभिनेत्री शुभांगी अत्रे बऱ्याच काळापासून तिचा पती पियुष पूरेपासून वेगळी राहत होती. पियुष हा डिजिटल मार्केटिंग व्यावसायिक आहे आणि हे जोडपे गेल्या दोन वर्षांपासून वेगळे राहत होते. आता ५ फेब्रुवारी रोजी त्यांचा अधिकृत घटस्फोट झाला आणि त्यांचे २२ वर्षांचे नाते संपुष्टात आले. आता या प्रकरणाबाबत अभिनेत्रीने स्वतःचे मत स्पष्ट केले आहे.
हे माझ्यासाठी खूप वेदनादायक होते – शुभांगी
अलीकडेच, एका मुलाखतीत, अभिनेत्रीने तिच्या नात्याबद्दल आणि तिच्यासाठी हा निर्णय किती कठीण होता याबद्दल सांगितले. शुभांगी म्हणाली की, ‘हे खूप वेदनादायक होते. मी या नात्यात पूर्णपणे गुंतले गेले होते आणि मी नेहमीच असं नातं जपत आली आहे. तथापि, काही काळानंतर, पियुष आणि माझ्यात बरेच मतभेद होऊ लागले. पण आता मी या नात्यातून बाहेर पडली आहे आणि मला खूप आराम वाटत आहे जणू काही माझ्यावरील एक मोठे ओझे दूर झाले आहे.’ असे ती म्हणाली आहे.
रान्या रावचा पोलिसांना दिलेल्या जबाबात धक्कादायक खुलासा, स्वत:चीही ओळख सांगितली
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘मला एक नवीन स्वातंत्र्य मिळाल्या सारखे वाटत आहे. या भावना शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे. आता मी माझी मुलगी आशीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करायचे ठेवले आहे. जेणेकरून मी तिला आनंदी आयुष्य देऊ शकेन.’ ते अभिनेत्रीने एका मुलाखतीद्वारे स्पष्ट केले आहे.
शेवटी तुम्हाला फक्त पश्चात्तापच होतो
या नात्यातून अभिनेत्री काय अनुभव घातला असे विचारले असता, याबद्दल बोलताना शुभांगी म्हणाली, “मी शिकलेला सर्वात मोठा धडा म्हणजे तुमच्या आनंदासाठी कधीही दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. जर तुम्ही इतरांनी तुमच्या गरजा पूर्ण करण्याची वाट पाहत राहिलात तर तुम्हाला आढळेल की आयुष्य निघून जात आहे. शेवटी तुम्हाला फक्त पश्चात्तापच होतो. जेव्हा तुम्ही आतून समाधानी असता तेव्हा तुमच्या आजूबाजूच्या लोकांनाही ती सकारात्मकता जाणवते.” असे अभिनेत्री म्हणाली आहे.
ती पुढे म्हणाली, ‘एक आई म्हणून तिला आशीचे तिच्या वडिलांशी असलेले नाते माहीत आहे.’ ती पुढे म्हणाली, “हे पूर्णपणे आशीवर अवलंबून आहे. जर तिला तिच्या वडिलांना भेटायचे असेल तर ती भेटू शकते. मी त्यात कधीही अडथळा आणणार नाही. आम्ही आमचे वेगळेपण खूप चांगल्या प्रकारे हाताळले आहे. मी तिच्या शिक्षणाची आणि इतर सर्व गोष्टींची पूर्ण जबाबदारी घेतली आहे. मी माझ्या पतीकडून किंवा त्याच्या कुटुंबाकडून कधीही काहीही मागितले नाही.” असे अभिनेत्रीने सांगितले आहे.