सुप्रसिद्ध कन्नड अभिनेत्री रान्या राव गेल्या काही दिवसांपासून कमालीची चर्चेत आहे. नुकतंच अभिनेत्रीकडून बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाने १४.८ किलो सोने जप्त करण्यात आल्याचं प्रकरण चांगलंच चर्चेत आहे. गेल्या दोन दिवसांपासून या प्रकरणात धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिस चौकशीदरम्यान अभिनेत्रीने १७ सोन्याचे कॉईन असल्याचे आणि तिच्या परदेश दौऱ्यांची कबुली दिली आहे. दुबईहून १४.८ किलोची १७ सोन्याची बिस्किटे तस्करी केल्याचे आरोप पोलिसांनी केले होते. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या रान्या रावने पोलिसांना दिलेल्या जबाबात तिच्याकडे १७ बिस्किटे असल्याचे कबूल केले आहे.
‘ही हिप्पोपोटॅमस मीच आहे का?’ बहिणीच्या लग्नात स्वतःला पाहून रागाने स्वतःलाच दिला दोष, केला खुलासा
रान्या राव ही वारंवार दुबईवारी करत असल्यामुळे ‘डीआरआय’चे अधिकारी तिच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. सोमवारी रात्री अभिनेत्रीला ताब्यात घेण्यात आले. ही अभिनेत्री कर्नाटकातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याची सावत्र मुलगी असल्याचंही समोर आल्यानं चर्चेला उधाण आलं होतं. तसंच काही धक्कादायक गोष्टी आता समोर आल्या आहेत. पोलिसांना दिलेल्या जबाबात अभिनेत्रीने काही धक्कादायक खुलासे केले आहेत. पोलिस जबाबात रान्या राव म्हणाली की, “मी युरोप, अमेरिका आणि अरब देशांमध्ये प्रवास केला आहे. (अरब देश- दुबई आणि सौदी अरेबिया). मी सांगू इच्छिते की, सध्या मी प्रवासामुळे फार थकलेली आहे. कारण मी व्यवस्थित आराम केलेला नाही. ”
Untavarche Shahane Movie: ‘उंटावरचे शहाणे’ चित्रपटाच्या चित्रीकरणाचा भव्य मुहूर्त सोहळा संपन्न!
शिवाय, कर्नाटकातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याची सावत्र मुलगी असल्याची बतावणी करणाऱ्या राण्या राव हिने स्वत:ची खरी ओळखही सांगितलीये. ती रियल इस्टेट व्यावसायिक के.एस. हेगदेश यांची मुलगी आहे. अभिनेत्रीचा पती जतीन हुक्केरी असून तो पेशाने आर्किटेक आहे. अभिनेत्रीने असेही म्हटले आहे की, तिची निष्पक्ष सुनावणी केली जात आहे. शिवाय तिने पोलिसांना जी काही तिने माहिती दिली आहे, ती कोणाच्याही दबावाखाली दिलेली नाही. राण्या राव म्हणाली की, तुरुंगात असताना तिला जेवण करण्यास सांगितले गेले होते, पण भूक नसल्याने तिने जेवण्यास नकार दिला होता. राण्या राव हिला बेंगळुरूच्या कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर बंदी असलेल्या वस्तू वस्तू घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर तिला महसूल गुप्तचर संचालनालयाने ‘डीआरआय’अटक केली.
अभिनेत्रीने एका महिन्यात ४ वेळा दुबईला प्रवास केला होता, त्यानंतर ती संशयाच्या भोवऱ्यात सापडली होती. डीआरआयने म्हटले आहे की, अलिकडच्या काळात बेंगळुरू विमानतळावर जप्त केलेल्या सोन्याच्या सर्वात मोठ्या कारवाईंपैकी ही एक मोठी कारवाई आहे. सोन्याची तस्करी करण्यासाठी रान्याला एक ड्रेसही तयार करून देण्यात आला होता. या दुबई दौऱ्यांसाठी ती तो ड्रेसच परिधान करायची. यात एक रिस्ट बेल्ट आणि मॉडिफाइड जॅकेट होतं. डीआरआय अधिकाऱ्यांनी अभिनेत्रीच्या घराचीही झाडाझडती घेतली होती. तिच्या घरावर टाकलेल्या धाडीमध्ये २.०६ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि २.६७ कोटी रुपये रोख जप्त केले. गेल्या वर्षभरात रान्या राव हिनं दोन -तीन वेळा नव्हे तर तब्बल ३० वेळा दुबईला येणं-जाणं केलं होतं. या दौऱ्यांमध्ये तिनं सोन्याची तस्करी केली होती.
सायबर सेलनंतर आता रणवीर- अपूर्वा महिला आयोगासमोर हजर, सुनावणीमध्ये आयोग काय म्हणाले ?
काही रिपोर्ट्सनुसार सोनं तस्करीसाठी अभिनेत्रीला प्रती किलो १ लाख रुपये असे तिला पैसे देण्यात आले होते. तर काही रिपोर्ट्सनुसार तिला प्रत्येक दौऱ्यासाठी १२ लाख देण्यात आले होते. रान्या रावने कस्टम्स तपासणीला बगल देण्यासाठी सावत्र वडिलांच्या नावाचा आणि त्यांच्या पदाचा उल्लेख केला होता. विमानातून उतरताना तिने कर्नाटकच्या डीजीपींची मुलगी असल्याचा दावा केला होता. या प्रकरणात के रामचंद्र राव यांनी तिच्या कारवायांशी कोणताही संबंध नसल्याचे सांगितले आहे. राण्या रावचे जतीन हुक्केरीशी लग्न झाल्यापासून ते संपर्कात नाहीत, असं देखील त्यांनी सांगितलंय. दरम्यान, रान्या राव हिला चौकशीसाठी विशेष न्यायालयाने १८ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अभिनेत्रीच्या जामीन अर्जावर आज (७ मार्च) सुनावणी केली जाणार आहे.