(फोटो सौजन्य - x अकाउंट)
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचे चित्रपटांच्या बाबतीत खूप चांगले करिअर राहिले आहे. तिने सलमान खान, अक्षय कुमार आणि अजय देवगण सारख्या मोठ्या अभिनेत्यांसोबत काम करून सगळे सुपरहिट चित्रपट दिले आहे. तिच्या प्रत्येक चित्रपटाला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले आहे. तसेच अभिनेत्री आज तिचा ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे. नुकतीच सोनाक्षी तिच्या लग्नाबाबत खूप चर्चेत राहिली आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या आयुष्यातील काही खास गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.
अभिनेत्रीने फॅशन डिझायनिंगमध्ये घेतले प्रशिक्षण
बॉलीवूडची दबंग गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. सोनाक्षी सिन्हाचा जन्म २ जून १८८७ रोजी बिहारची राजधानी पटना येथे झाला. ती ज्येष्ठ अभिनेते शश्रुघ्न सिन्हा आणि अभिनेत्री पूनम सिन्हा यांची मुलगी आहे. तिचे वडील अभिनेते तसेच राजकारणी आहेत. सोनाक्षीने फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतले. सुरुवातीला सोनाक्षीने कॉस्च्युम डिझायनर म्हणून काम केले. तिने २००५ मध्ये आलेल्या ‘मेरा दिल लेके देखो’ चित्रपटासाठी कॉस्च्युम डिझाइन केले. त्यानंतर ती चित्रपटांकडे वळली.
प्रसिद्ध दिग्दर्शक Vikram Sugumaran यांचे धक्कादायक निधन, वयाच्या ४७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
पहिला चित्रपट ठरला यशस्वी
कॉस्च्युम डिझायनिंगमध्ये काम केल्यानंतर सोनाक्षी सिन्हा सिनेमासृष्टीकडे वळली. सोनाक्षी सिन्हाने सलमान खानच्या ‘दबंग’ (२०१०) या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिचा पहिला चित्रपट यशस्वी झाला. तिला सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. एवढेच नाही तर तिच्या चित्रपटानेही भरपूर कमाई केली. चित्रपटाचे बजेट ४१ कोटी रुपये होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २२१.१४ कोटी रुपये कमावले.
मोठ्या कलाकारांसोबत केले काम
सोनाक्षी सिन्हाचा दुसरा चित्रपट ‘राउडी राठोड’ होता. या चित्रपटात तिने अक्षय कुमारसोबत काम केले. ६० कोटी खर्चून बनवलेल्या या चित्रपटाने २०३.३९ कोटी रुपये कमावले. त्यानंतर सोनाक्षी सिन्हा ‘जोकर’मध्ये अक्षय कुमारसोबत दिसली. सोनाक्षीने २०१२ मध्ये अजय देवगणसोबत ‘सन ऑफ सरदार’ चित्रपटात काम केले. हा चित्रपटही खूप यशस्वी झाला. २०१२ मध्ये सोनाक्षी पुन्हा एकदा सलमान खानसोबत ‘दबंग २’मध्ये काम केले आणि चाहत्यांचे मन जिंकले.
Housefull 5 च्या इव्हेंटदरम्यान गर्दी नियंत्रणाबाहेर; चाहते लागले रडू, अक्षयने हात जोडून केली विनंती
वेब सिरीजमध्ये केले उत्तम काम, गाण्यातही हात आजमावला
चित्रपटांमध्ये उत्तम काम करण्यासोबतच सोनाक्षी सिन्हाने मालिकांमध्येही चांगले काम केले आहे. दहर (२०२३) आणि हीरामंडी (२०२४) या मालिकेतील तिच्या अभिनयासाठी तिने कौतुकास्पद कामगिरी केली. अभिनयाव्यतिरिक्त, सोनाक्षी सिन्हाने गायनातही हात आजमावला आहे. तिने तिच्या ‘तेवर’ (२०१५) या चित्रपटात एक गाणे गायले. तिचे पहिले गाणे ‘आज मुड इश्कहोलिक है’ २०१५ मध्ये प्रदर्शित झाले.
सोनाक्षी तिच्या प्रेम जीवनामुळे चर्चेत राहिली
सोनाक्षी सिन्हाने २३ जून २०२४ रोजी तिचा बॉयफ्रेंड झहीर इक्बालशी लग्न केले. एका बातमीनुसार, झहीर आणि सोनाक्षी एकमेकांना सात वर्षे डेट करत होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. असे म्हटले जाते की दोघेही सलमान खानच्या एका पार्टीत भेटले. त्यानंतर दोघेही मित्र झाले. काही दिवसांनी मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. २०२३ मध्ये सलमानची बहीण अर्पिता आणि आयुषच्या ईद पार्टीत झहीर आणि सोनाक्षीने जोडी म्हणून प्रवेश केला. त्यानंतर दोघांमधील अफेअरची अफवा खरी ठरली. २०२४ मध्ये दोघांनीही लग्न केले. या दोघांच्या लग्नामुळे चाहत्यांमध्ये चर्चा सुरु झाली आणि सोनाक्षीने आणखी प्रसिद्धी मिळवली.