(फोटो सौजन्य - इंस्टाग्राम)
आपल्या आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करणारा गायक सोनू निगम राष्ट्रपती भवनात गाण्याची संधी मिळालेला पहिला भारतीय गायक ठरला आहे. प्रकृती अस्वास्थ्य असूनही, सोनू निगम अलीकडेच ३ फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती भवन दिनानिमित्त दिल्लीला पोहोचला. या खास प्रसंगी, त्यांनी नवीन ओपन एअर थिएटरमध्ये देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासमोर सादरीकरण केले. त्यांनी अलिकडेच त्यांचा अनुभव शेअर केला आणि गायकाच्या प्रकृतीची काळजी घेत आपल्या राष्ट्रपतींनी डॉक्टरांची एक टीम तिथे कशी बोलावली हे देखील सांगितले.
सोनू निगम यांनी सांगितले राष्ट्रपती मुर्मू यांच्यासोबतची त्यांची भेट कशी झाली
हिंदुस्तान टाईम्सशी खास बोलताना गायक म्हणाला, “एक भारतीय म्हणून, मला राष्ट्रपती भवन दिनानिमित्त आपल्या देशाच्या राष्ट्रपतींसमोर सादरीकरण करण्याची संधी मिळालीच, शिवाय त्यांच्याशी संवाद साधण्याचा मानही मिळाला. नवीन अँप थिएटरमध्ये सादरीकरण करण्याची संधी मिळालेला मी पहिला कलाकार आहे. हे माझे भाग्य आहे. त्यांनी मलाच नाही तर माझ्या कुटुंबालाही आमंत्रित केले होते. या खास प्रसंगी माझे वडील, बहीण आणि माझा मेहुणा माझ्यासोबत उपस्थित होते.” असे त्यांनी म्हटले आणि त्यांचे आभार व्यक्त केले.
राष्ट्रपतींच्या डॉक्टरांनी केले सोनू निगमवर उपचार
एका लाईव्ह परफॉर्मन्स दरम्यान सोनू निगमला खूप पाठदुखी झाली. या गायकाने एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये तो हॉस्पिटलच्या बेडवर पडलेला दिसत होता. सोनू निगम म्हणाले की, ‘राष्ट्रपती भवनात सादरीकरण करणे हा त्यांच्यासाठी सन्मान होता, पण ते अजिबात सोपे नव्हते.’ ते म्हणाले की, “अलीकडेच मला पाठीच्या खूप समस्या होत्या आणि काल सादरीकरणापूर्वी मला बरे वाटत नव्हते. तथापि, राष्ट्रपतींच्या डॉक्टरांनी मला पाहिले आणि शोच्या ४५ मिनिटे आधी माझ्यावर उपचार केले. त्यानंतर, मला बरे वाटले आणि मी एक चांगला शो करू शकलो, जो लोकांना खूप आवडला”. असे गायकाने सांगोतले.
वीर पहारियाची खिल्ली उडवणाऱ्या कॉमेडियन प्रणित मोरेला मारहाण, हल्ला करणाऱ्या 12 जणांवर गुन्हा दाखल!
गायकाने संगीत प्रवासाबद्दल सांगितले.
सोनू निगमने त्यांच्या सुंदर अनुभवाबद्दल पुढे सांगितले आणि म्हणाले की, “आपले राष्ट्रपती खूप चांगले व्यक्ती आहेत, त्यांनी सुरुवातीपासूनच मला समजून घेतले. जेव्हा तुम्ही राष्ट्रपतींसमोर असता तेव्हा तुम्ही मोकळेपणाने बोलण्यास आणि शांत राहण्यास कचरता, परंतु त्यांनी माझ्या संगीत प्रवासाबद्दल माझ्याशी अगदी मोकळेपणाने बोलले. त्यांनी सा रे गा मा दिवसांबद्दल आणि मी जागतिक स्तरावर भारताला कसे सादर केले याबद्दल सांगितले, हे माझ्यासाठी बक्षीसापेक्षा कमी नव्हते”. असे ते सोनू निगम म्हणाले.