(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
उषा काकडे यांच्या यूट्यूब चॅनेलवर, सुनीता आहुजा यांना त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळाबद्दल विचारण्यात आले आणि त्यांनी कोणताही संकोच न करता सांगितले की, “जेव्हा माझी दुसरी मुलगी जन्माला आली तेव्हा ती अकाली जन्मली. ती तीन महिने माझ्या हातात होती, पण तिचे फुफ्फुस व्यवस्थित विकसित झाले नव्हते. म्हणून, अखेर, एका रात्री, तिला योग्यरित्या श्वास घेता आला नाही आणि ती माझ्या हातात माझ्या मांडीवर मरण पावली. माझ्यासाठी ते खूप कठीण होते. आज मला दोन मुली आणि एक मुलगा असता.”
सुनीता आहुजाच्या मुलीचे निधन
हॉटरफ्लायला दिलेल्या जुन्या मुलाखतीत सुनीता यांनी याबद्दल सांगितले आणि शेअर केले, “त्यांच्या बाळाचा जन्म अकाली झाला होत, ८ महिन्यांत तिचा जन्म झाला कारण मी गोविंदासोबत खूप प्रवास करत होते. मला काहीच कल्पना नव्हती…पहिली प्रसूती सुरळीत झाली, मला वाटले की दुसरीही अशीच असेल, म्हणून मला माहित नव्हते की तिचे वजन कमी होते आणि अखेर त्याचा या बाळावर परिणाम झाला.”
मुलगा यशवर्धनच्या जन्मानंतरही आल्या अडचणी
या दुःखद घटनेनंतर सुनीता आणि गोविंदाने मुलगा यशवर्धनचे स्वागत केले. एका जुन्या मुलाखतीत तिने यशवर्धनच्या जन्मादरम्यान तिला येणाऱ्या अडचणींबद्दलही सांगितले. ईट ट्रॅव्हल रिपीट या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सुनीता म्हणाली, “मी माझा मुलगा यशला जन्म देत असताना माझे वजन १०० किलो होते. माझे वजन खूप वाढले होते. मला वाटले की मी मरेन. मला पाहून गोविंदा रडू लागायचा.” परंतु त्याचा यशवर्धनचा जन्म वैवस्थित झाला.
गोविंदाला हवा होता मुलगा
पुढे सुनीता आहुजा म्हणाल्या, “त्या काळात लिंग निर्धारण चाचण्या कायदेशीर होत्या. आम्हाला माहित होते की आम्हाला मुलगा होणार आहे. मी डॉक्टरांना म्हणाली, ‘डॉक्टर, माझ्या नवऱ्याला मुलगा हवा आहे. कृपया मुलाला वाचवा. जरी मी या प्रक्रियेत मरण पावले तरी ठीक आहे.” हा संपूर्ण प्रसंग सांगताना अभिनेत्री भावुक झालेली दिसली.






